चांद्रयान 3 मोहिमेत अत्यंत महत्त्वाचा शोध; चंद्राच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन, कॅल्शियम, आयर्न असल्याचे पुरावे

Chandrayaan 3 : भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेतील सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. भारताच्या चांद्रयान मोहिमेत महत्त्वाचा शोध लागला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन असल्याचे पुरावे चांद्रयान 3 ला आढळले आहेत. तसंच चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोखंड, क्रोमियम, टायटॅनियमही असल्याचेही आढळलं आहे. या सर्व मुलद्रव्यांचे पुरावे सापडल्यानं चांद्रयान मोहिमेतला हा मोठा शोध मानला जातोय. हायड्रोजनचा मात्र अजूनही शोध केला जात आहे.

चांद्रयान 3 मोहिमेतील  मोठे यश

चांद्रयान 3 चा प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर भ्रमण करत आहे. प्रज्ञान रोव्हरने संशोधना दरम्यान चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर (S ) असल्याची पृष्टी केली आहे. प्रज्ञान रोव्हरवर असलेल्या लेझर-प्रेरित ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS) अर्थात साधन मोजमाप पेलोडच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागावर विविध खनिजांचा शोध घेतला जात आहे. दक्षिण ध्रुवाजवळील चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर (एस) च्या असल्याची पुष्टी रोव्हरने केली आहे. 

हेही वाचा :  'साहेब बहुतेक हत्या झाली आहे', मेहुणीची हत्या केली आणि मृतदेह पोत्यात भरला; पण एक चूक पडली महागात

 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …