‘Ved’च्या शूटिंगदरम्या रितेश-जिनिलियाला पाहायला चाहत्यांची तुडूंब गर्दी

Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया (Genelia Deshmukh) देशमुखचा ‘वेड’ (Ved) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात रितेशने अभिनय आणि दिग्दर्शन अशी दुहेरी भूमिका बजावली आहे. 

रितेशने एकाचवेळी अभिनय आणि दिग्दर्शन कसं जमवलं यासंदर्भात एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत या सिनेमाचा सहाय्यक दिग्दर्शक रोहन कोतेकर म्हणाला,”दिग्दर्शन आणि अभिनेता म्हणून काम करताना रितेश देशमुख वेगवेगळ्या दृष्टीने काम करतात. ते कॅमेऱ्याच्या मागे काम करताना आणि कॅमेऱ्यासमोरदेखील शंभर टक्के देतात. स्वीच ऑन आणि स्वीच ऑफ करणं त्यांना उत्तमप्रकारे जमलं आहे”.

एखादा शॉट शूट केल्यानंतर ते स्वत: बघायला यायचे. त्यांना तो शॉट आवडला नाही तर ते पुन्हा शॉट देत असे आणि जर तो शॉट त्यांना आवडला नाही तर ते परत कॅमेऱ्यासमोर जाऊन काहीतरी अॅड करत असत. एखादा शॉट शूट करण्याआधी ते आम्हा सर्वांसोबत चर्चा करत असे. प्रत्येक शॉटसाठी ते मेहनत घेत होते. आम्हाला त्यांच्याकडून नव-नवीन गोष्टी शिकता आल्या”.

रोहन पुढे म्हणाला,”रितेश देशमुख यांचं नाव खूप मोठं आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना दडपन होतं. दिग्दर्शक म्हणून पदार्पण करताना एखादा नवोदित दिग्दर्शक ज्याप्रमाणे काम करेल त्याचपद्धतीने रितेश देशमुख यांनी काम केलं. मनोरंजनसृष्टीत आज मी नाव कमावलं आहे असं त्यांच्या वागण्या-बोलण्यात कुठेच नव्हतं. एखादा शॉट शूट करण्याआधी ते आम्हा सर्वांसोबत चर्चा करत असे. प्रत्येक शॉटसाठी ते मेहनत घेत होते. आम्हाला त्यांच्याकडून नव-नवीन गोष्टी शिकता आल्या. ‘वेड’ या सिनेमाच्या दिग्दर्शन टीममधील प्रत्येकाकडे काही ना काही कौशल्य होतं. त्यामुळे सर्वच मंडळी एकमेकांकडून काही ना काही शिकत होते”. 

हेही वाचा :  The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'वर न्यूझीलंडमध्ये बंदी, माजी उपपंतप्रधानांकडून निषेध

live reels News Reels

‘वेड’ या सिनेमाच्या सेटवरचं वातावरण खूपच चांगलं होतं. कौटुंबिक वातावरण निर्माण झालं होतं. ‘वेड’ या सिनेमातील अनेकांचा हा पहिलाच बिग बजेट सिनेमा आहे. पण आता सिनेमा रिलीज झाल्यानंतर हा अनेकांचा पहिला सिनेमा आहे हे कुठेही जाणवत नाही. जिनिलिया देशमुख या सिनेमाच्या निर्मात्या होत्या. प्रोडक्शन टीम खूप चांगली होती. तक्रार करण्यासाठी त्यांनी जागा ठेवली नाही. एकमेकांच्या चुका सांभाळून घेतल्या जात होत्या”.

शूटिंगदरम्यान रितेश-जिनिलियाला पाहायला चाहत्यांची तुडूंब गर्दी 

‘वेड’ या सिनेमाचं अलिबागला शूटिंग सुरू होतं. या शूटिंगदरम्यान रितेश-जिनिलियाला पाहायला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्या चाहत्यांना सांभाळणं खूप अवघड जात होतं. बॉडीगार्डदेखील कमी पडले होते. त्यावेळी सिनेमातील वेगवेगळ्या डीपार्टमेंटमधील मंडळी रितेश देशमुखसाठी पुढे आली आणि त्यांनी गर्दी कमी करण्यास मदत केली. 

‘वेड’ या सिनेमाच्या दिग्दर्शन रितेश देशमुख यांनी केलं  आहे. तर प्रतीक पाटील, अभय राऊत, सागरिका जोशी, रोहन कोतेकर आणि रितीक कदम यांनी या सिनेमाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

संबंधित बातम्या

Genelia Deshmukh: ‘टाळ्या, शिट्ट्यांनी तुम्ही स्वागत केलं…’; जिनिलियाची खास पोस्ट

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …