जिभेच्या स्वच्छतेसाठी वापरा या ट्रिक्स

तोंड स्वच्छ करणे म्हटलं की दात सुंदर दिसणे, दातांची स्वच्छता असंच एक चित्र समोर येतं. मात्र चेहरा आणि दातांसह जिभेची स्वच्छताही गरजेची आहे. जीभ स्वच्छ न केल्यास, तोंडाला दुर्गंधी येण्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. तसंच अनेक आजारांना निमंत्रणही द्यावे लागते. वास्तविक आपण स्वतःची आणि आपल्या लहान मुलांचीही जिभेची स्वच्छता नीट करत नाही आणि परिणामी बॅक्टेरिया पोटात जाऊन वरचेवर आजाराला बळी पडतो. जिभेची स्वच्छता कशी करावी आणि दिवसातून किती वेळा जीभ स्वच्छ करावी याबाबत माहिती.

टूथब्रश

बाजारामध्ये अनेक टूथब्रश असे आहेत ज्यांना जीभ स्वच्छ करण्यासाठी टंग क्लिनरही मागच्या बाजूला डिझाईन करण्यात आलेला असतो. जीभ स्वच्छ करण्यासाठी दात घासून झाल्यानंतर ब्रश जिभेच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला फिरवा. साधारण तीन-चार वेळा असं केल्यानंतर पाण्याने स्वच्छ चूळ भरून तोंड धुवा. तुमच्या जिभेवरील साचलेली घाण जाण्यास मदत मिळते.

टंग स्क्रॅपर

जीभ स्वच्छ करण्यासाठी सर्वात सोपा आणि चांगला उपाय आहे. टंग स्क्रॅपर घेऊन जिभेच्या मागच्या बाजूला ठेवा आणि मग हळूहळू पुढच्या बाजूला खेचा. स्क्रॅपरचा भाग मोठा असल्यामुळे संपूर्ण जीभ स्वच्छ करण्यासाठी याचा योग्य उपयोग होतो. तसंच जीभ अस्वच्छ राहिली आहे असं अजिबातच घडत नाही. टंग स्क्रॅपरचा वापर केल्यास, बॅक्टेरियाचा त्रास होत नाही.

हेही वाचा :  महाराष्ट्रातील 500 वर्ष जुना समुद्री किल्ला; अभेद्य आणि अंजिक्य, महाराजांनाही जिंकता आला नाही

(वाचा – लहान मुलांमध्ये वाढतेय Stranger Anxiety, याचा अर्थ काय समजून घ्या)

मीठ

तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने जीभ स्वच्छ करायची असेल तर मीठाचे पाणी लहान मुलांना द्या अथवा स्वतःसाठी घ्या. या पाण्याने चूळ भरल्यासही जीभ स्वच्छ होते. मीठ हे नैसर्गिक स्क्रब असून केवळ मीठ जिभेवर घासल्यासदेखील याचा परिणाम होतो. मीठ जिभेवर घासा आणि मुलांना चूळ भरायला लावा. यामुळे मुलांना त्रासही होणार नाही. कधीतरी ब्रश अथवा टंग स्क्रॅपरचा मुलांना त्रास जाणवू शकतो. मिठाने असा कोणताही त्रास होणार नाही.

(वाचा – पालकांच्या या ५ चुका मुलांना बनवतात स्वार्थी आणि जिद्दी)

हळद

हळदीनेदेखील तुम्ही मुलांची जीभ स्वच्छ करू शकता. हळद पावडर ब्रशवर लावा आणि मग हलक्या हाताने स्क्रब करा. जिभेला त्रास होईल असं अजिबात घासू नका. त्यानंतर कोमट पाण्याने तोंड व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. मुलांना सहसा हळदीचा स्वाद आवडत नाही. मात्र हळद अँटिबायोटिक असल्यामुळे याचा चांगला परिणाम होतो. त्यामुळे सहसा याचा वापर करून घ्यावा.

(वाचा – या ६ गोष्टी करा आणि मुलांना स्मार्टफोन आणि टीव्हीपासून दूर ठेवा, प्रत्येक पालकांसाठी उपयुक्त टिप्स)

हेही वाचा :  महिलेचा दफनविधी झाला, ११ दिवसानंतर कबरीतून येऊ लागले काळीज चिरणारे आवाज, भयानक सत्य समोर

जीभ स्वच्छ झाली आहे कसे समजावे?

जिभेला स्क्रबिंग, हळद, टूथब्रशने स्वच्छ करून झाल्यावर आरशात नक्की पाहा. जीभ गुलाबी अथवा फ्रेश दिसत असेल तर तुमची जीभ व्यवस्थित स्वच्छ झाली आहे. पण जर जिभेवर पिवळटपणा अथवा पांढरा रंग दिसत असेल तर जीभ पुन्हा स्वच्छ करण्याची गरज आहे.

दिवसातून किती वेळा जीभ स्वच्छ करावी?

तुम्ही जर मुलांच्या जिभेवरील अथवा स्वतःच्या जिभेवरील बॅक्टेरिया अथवा प्लाक काढून टाकण्यासाठी जीभ स्वच्छ करत असाल तर दिवसातून कमीत कमी २ वेळा जीभ स्वच्छ करावी. सर्वात योग्य पद्धत म्हणजे दात घासून झाल्यावर मुलांना सवय लावावी की, ब्रश केल्यानंतर आपली जीभ लगेच स्वच्छ करावी. झोपण्यापूर्वी जीभ स्वच्छ केल्याने बॅक्टेरिया निर्माण होत नाहीत. तसंच आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.

(फोटो क्रेडिटः Freepik.com)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …