UPI Payment खूप वापरत असाल तर द्या लक्ष, एक चूक पडू शकते महागात

नवी दिल्ली: UPI Fraud: UPI करत असताना एका चुकीमुळे देखील तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. आणि तुमचे बँक अकाउंट देखील रिकामे होऊ शकते. महत्वाचे म्हणजे याबात नुकतंच एक घोटाळा समोर आला आहे. या प्रकारच्या स्कॅम्सपासून दूर राहायचे असल्यास अलर्ट राहणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही Selling App वर एखादी जाहिरात पोस्ट करता आणि तुम्हाला कॉल येतो. त्यावेळी अनेकदा तुम्हाला ऍडव्हान्स पैसे भरण्यास सांगितले जाते आणि हे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एक लिंक पाठवली जाते. या लिंकवर जाताच डायरेक्ट पेमेंट पेज उघडते.

वाचा: Airtel चा जबरदस्त प्लान , एकाच रिचार्जमध्ये सिम चालेल वर्षभर, सोबत डिस्ने+ हॉटस्टार आणि बरच काही

पण, UPI एंटर करण्यापूर्वी, तुम्हाला ते पेमेंट करायचे आहे की नाही ते तपासणे महत्वाचे आहे. पेमेंट प्राप्त करण्यापूर्वी तुम्हाला कधीही UPI एंटर करण्याची गरज नाही. अशात, युजर्सने खूप सावध असणे आवश्यक आहे. बरेच लोक विचार न करता थेट UPI मध्ये प्रवेश करतात. परंतु, पेमेंट प्राप्त करण्यापूर्वी तुम्हाला कधीही UP एंटर करण्याची गरज नाही.

वाचा: बजेट ते प्रीमियम स्वस्त झाले OnePlus चे ‘हे’ स्मार्टफोन्स, Amazon वर जबरदस्त सेल

हेही वाचा :  गुगल क्रोम देशासाठी धोकादायक? भारत सरकारने जारी केला गंभीर ईशारा

Paytm, Phonepe, Google Pay वरही पेमेंट करताना असे घोटाळे होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. OTP न विचारता बँक खात्यातून पैसे काढले जातात. याचा अर्थ VPN कनेक्ट करून फसवणूक केली जाते. बँक खात्यातून पैसे काढण्यापूर्वी तुम्हाला App Install करण्यास सांगितले जाते. हे अॅप VPN शिवाय दुसरे काही नसते . VPN कनेक्ट केल्यानंतर OTP न विचारताही बँक खात्यातून पैसे डेबिट करू शकतात.

व्यवहार करण्यापूर्वी नेहमी UPI आयडी व्हेरिफाय करा :

UPI अॅप युजर्सना विशिष्ट UPI ID वर पैसे ट्रान्सफर करण्यास मदत करते. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा युनिक UPI आयडी वापरून इतरांकडून पेमेंट देखील मिळवता. जेव्हा तुम्हाला पैसे मिळत असतील, तेव्हा नेहमी योग्य UPI आयडी शेअर करा आणि तो पुन्हा तपासा. व्यवहार सुरू करण्यापूर्वी रिसिव्हरचा UPI आयडी पुन्हा तपासणे नेहमीच आवश्यक असते.

वाचा: 5G Smartphone साठी खूप खर्च करण्याची नाही गरज, स्वस्तात घरी येतील हे डिव्हाइसेस

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …