गुगल क्रोम देशासाठी धोकादायक? भारत सरकारने जारी केला गंभीर ईशारा

Google Chrome Alert: गुगल क्रोम (Google Chrome) तुम्हीदेखील वापरता का? मोबईल फोन असो किंवा लॅपटॉप यात गुगल क्रोमचा वापर केला जातो. रोजच्या कामासाठी व ऑनलाइन सर्चसाठीदेखील आपण गुगल क्रोमवर निर्भर आहोत. तुम्हीदेखील गुगल क्रोमचा अतिवापर करत असाल तर तुम्हालादेखील सतर्क होण्याची गरज आहे. कारण गुगल क्रोम भारतासाठी धोकादायक ठरु शकते. सरकारकडून गुगल क्रोमला अलर्ट जारी करण्यात आला आहे. नेमकं काय आहे प्रकरण आणि युजर्सनी काय करावे? हे जाणून घेऊया. (Google Chrome Alert News)

66 टक्के सर्च मार्केटमध्ये गुगल क्रोमने कब्जा केला आहे. त्यामुळं सर्व मोबाइल, लॅपटॉप आणि कंप्युटर युजर्सने ही बातमी जाणून घ्या. गुगल क्रोमने सिक्योरिटी अलर्ट जारी केला आगे. क्रोमच्या वापरामुळं तुमची संवेदनशील माहिती चोरी होऊ शकते. सरकारनेदेखील अलर्ट जारी केला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, गुगल क्रोममध्ये अनेक त्रुटी असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळं भारत सरकारच्या कंप्यूटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीमकडून हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

भारत सरकारच्या सिक्युरीटी एजन्सीचे दावा केला आहे की, गुगल क्रोमला रिमोटली कंट्रोल केले जात आहे. त्याचबरोबर यात मॅलशियस कोडदेखील टाकला जातो. या पद्धतीने हॅकर्स युजर्सचा संवेदनशील डेटा चोरी करु शकतात. CERT-In कडून सिक्योरिटी अॅडवायजरी जारी करण्यात आली आहे. यात वेब पेजवर सायबर हल्ला होऊ शकतो. 

हेही वाचा :  निव्वळ सात सेकंदाच्या व्हिडीओमुळे ‘ही’ मुलगी झाली Viral, नक्की काय झालं जाणून घ्या

दरम्यान, सायबर क्राइमचे वाढते प्रमाण पाहता युजर्सने इंटरनेट वापरताना सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी आणि ओटीपी शेअर करताना समोरील व्यक्ती ओळखीची आहे का? याची खात्री करुन घ्या. कारण गेल्या काही वर्षांपासून अनेक प्रकार समोर आले आहेत. सायबर चोरटे खात्यातून हातोहात लाखो रुपये लंपास करत आहेत. 

काय काळजी घ्यावी

– युजर्सना इंटरनेटवर ब्राउजिंग करताना (सर्च) सतर्क राहायला हवा

– जर तुम्ही एखाद्या अज्ञात वेबसाइटवर व्हिजिट करत असाल तर त्यावेळी सावधान राहायला हवे

– युजर्सना कोणत्याच थर्ड पार्टी लिंकवर क्लिक करणे टाळले पाहिजे

– त्याचबरोबर गरज नसलेल्या ईमेल किंवा मेसेजवर रिप्लाय करणे टाळावे. तसंच, एखाद्या अज्ञात व्यक्तीसोबत ऑनलाइन संवादही टाळावा. 

– सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या गुगल क्रोम ब्राउजरला वेळोवेळी अपडेट करणेही गरजेचे आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …