Google Chrome: 15 मिनिटापूर्वी तुम्ही काय काय Search केलं? सगळं काही होईल डिलीट, जाणून घ्या कसं?

Google Chrome New Feature: गुगलमुळे (Google) सर्वांची लाईफ सुपरफास्ट झाली आहे. गुगलचं लोकप्रिय ब्राऊझर क्रोम (Chrome) हल्ली सर्वजण वापरतात. त्यामुळे नवनवीन अपडेटसह गुगल लोकांसाठी फिचर्स घेऊन येतं. अशातच आता गुगल ब्राऊझर क्रोमसाठी ‘क्विक डिलीट’ फंक्शनवर (Quick delete function) काम करत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांना शेवटच्या 15 मिनिटांचा ब्राऊझर हिस्ट्री (Chrome browser history) तात्काळ क्लिन करण्यास सहमती देईल. क्रोमचं हे फिचर सर्वप्रथम वेबसाइट क्रोमस्टोरीच्या निदर्शनास आलं होतं. त्यानंतर 15 मिनिटापूर्वीची हिस्ट्री देखील डिलीट केली जाऊ शकते.

अॅड्रोईड (Android) आणि डेस्कटॉपसाठी क्रोम (Chrome) आधीपासूनच वापरकर्त्यांना हिस्ट्री टॅबमध्ये दिवसांनुसार ब्राउझिंग सेशन पाहिली जाऊ शकतात. आपण शेवटच्या तासापर्यंत आपला ब्राउझिंग डेटा देखील साफ करू शकतो. मात्र, पूर्णपणे डाटा क्लिअर (Chrome Data clear) केला जात नाही.

अॅड्रोईड युझर्सला आता वेब हिस्ट्रीवर (Web history) आणि जास्त सुविधा उपलब्ध असणार आहे. क्रोमच्या डेस्कटॉप व्हर्जनवर (Chrome Desktop version) अनेक वेळेच्या सुविधा दिल्या जातात. त्यानुसार 24 तास, 7 दिवस आणि 1 महिना, अशा सुविधा दिल्या जातात.  त्यानंतर आता 15 मिनिटांची सुविधा उपलब्ध होणार आहे. गुगल सध्या त्यावर काम करत असल्याचं पहायला मिळतंय. 

हेही वाचा :  Public Wi-Fi वापरताना घ्या काळजी, अन्यथा हॅकर्सकडे जातील महत्वाचे डिटेल्स

आणखी वाचा – तुम्हाला वाटेल स्क्रीनला काय झालं? पण थांबा, Google ने कमाल केलीये…

दरम्यान, सर्च हिस्ट्रीचा डाटा (Search history data) लवकर क्लियर व्हावा, यासाठी अनेकजण क्रोमचा वापर गुगल सर्चसाठी (Google Search) करतात. सुरक्षेचं महत्त्व लक्षात घेऊन गुगल त्यावर काम करत आहे. वेगवेगळ्या असुरक्षित वेबसाईटवरून (Insecure website) काहीही अनावश्यक डाटा डाऊनलोड करण्यापासून नेटकऱ्यांना अलर्ट करणे हा देखील उद्देश गुगलचा आहे. त्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज देखील काम करत आहेत. त्याचबरोबर HTTPS आणि URL ची देखील पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे ऑटोमॅटिक हा साईट्स ब्लॉक केल्या जातील.

Google Chrome 3 नवे Features :

गुगल वापरकर्त्यांना सुविधा देण्याचं काम करतं. नुकतंच गुगलने क्रोमचे तीन नवे फिचर्स (Google Chrome Three New Feature) आणले आहेत. ज्याद्वारे लिंक शेअर करण्याची चांगली पद्धत आणि सुविधा देण्यात आली आहे. त्याचबरोबर टॅब सर्चची सुविधा आणि नवीन बॅकग्राऊंड सिलेक्ट करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे त्याचा फायदा वापरकर्त्यांना होताना दिसतोय.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …