उद्धव ठाकरेंची सुरक्षा Z+ वरुन Y दर्जा करण्यात आली, म्हणजे नेमकं काय झालं? कोण घेतं हा निर्णय?

Uddhav Thackeray Security Reduced: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या (Thackeray Family Security) सुरक्षेत राज्यामधील सत्ताधारी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने कपात केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. आतापर्यंत ठाकरे कुटुंबियांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली जात होती. मात्र आता त्यांना व्हाय दर्जाची सुरक्षा पुरवली जाणार आहे. याशिवाय मुंबईतील कलानगर येथे ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ येथील सुरक्षारक्षकांच्या संख्येतही कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘मातोश्री’वरील एसआरपीएफची सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंच्या सुरक्षा ताफ्यातील एक एस्कॅार्ट गाडीही कमी करण्यात आली आहे, तसेच एक पायलट वाहनही कमी करण्यात आलं आहे. मात्र अशाप्रकारे सुरक्षा नेमकी कोणाला आणि का पुरवली जाते. सुरक्षा झेड प्लस वरुन व्हाय झाली म्हणजे नेमकं काय झालं? यासारख्याच प्रश्नांची उत्तर जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न…

हेही वाचा :  Election Results: “महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडू शकतं”

कोणाला VIP सुरक्षा पुरवली जाते?

अशाप्रकारची विशेष सुरक्षा कोणाला पुरवली जाते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर प्रसिद्ध राजकीय नेते, कलाकार, उद्योजक आणि खेळाडूंना अशी सुरक्षा पुरवली जाते. केंद्र किंवा राज्य सरकारकडून अशी विशेष सुरक्षा पुरवली जाते. ज्या अती महत्त्वाच्या व्यक्तींच्या जीवाला धोका असतो अशा लोकांना ही सुरक्षा पुरवली जाते. मात्र कोणाला कुठल्या प्रकारची सुरक्षा दिली जाते याचा निर्णय पूर्णपणे सरकारच्या हाती असतो. सुरक्षेचे X, Y, Z आणि एसपीजी कमांडो असे प्रकार आहेत. वेगवेगळ्या परिस्थितीनुसार वेळोवेळी या व्हिआयपी सुरक्षेचा आढावा घेऊन सरकारकडून या सुरक्षेच्या दर्जामध्ये अनेकदा बदल केला जातो. मागील काही वर्षामध्ये सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला, शिवसेनेबरोबरच्या वादानंतर अभिनेत्री कंगना रणौत, एनसीबीचे मुंबईचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती.

कसा घेतला जातो सुरक्षा देण्याचा निर्णय?

एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला धमकी मिळाली किंवा त्याच्या जीवाला धोका असल्याची माहिती मिळाली तरच त्याला विशेष सुरक्षा पुरवली जाते असा एक गैरसमज आहे. मात्र अशाप्रकारची वेगवेगळ्या दर्जाची सुरक्षा ही धमकी मिळाल्याच्या एकमेव आधारावर पुरवत नाहीत. अशी सुरक्षा सामान्यपणे मोठ्या हुद्द्यावर, पदावर असणाऱ्या किंवा प्रभावशाली तसेच अती महत्वाच्या व्यक्तींनाच केंद्रीय गृहमंत्राल पुरवली जाते. मात्र ही सुरक्षा पुरवण्याआधी केंद्र सरकार अनेक गोष्टींचा विचार करते. त्यानंतर ही सुरक्षा वाढवायची की कमी करायची हे ठरवलं जातं. राज्यातील पोलीस यंत्रणेबरोबरच इतर सुरक्षा यंत्रणांच्या सहकार्यानेच ही सुरक्षा पुरवली जाते. एखाद्या व्यक्तीला कोणत्याप्रकारची सुरक्षा पुरवली जाणार यासंदर्भातील निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयच घेते. हा निर्णय घेताना गुप्तचर यंत्रणांकडून म्हणजेच रिसर्च अॅण्ड अॅनलिसिस विंग म्हणजेच ‘रॉ’ आणि इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच ‘आयबी’चा सल्ला घेतला जातो. सध्या केंद्रीय गृहमंत्रालयाची धुरा अमित शाह यांच्याकडे आहे.

हेही वाचा :  Maharashtra Politics: शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी कधी? यावेळची सर्वात मोठी अपडेट समोर

एक्स सुरक्षा –

या कॅटेगरीतंर्गत अती महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी फक्त 2 जणांची सुरक्षा पुरवली जाते. ही फार बेसिक लेव्हलची सुरक्षा मानली जाते.

वाय सुरक्षा –

वाय कॅटेगरीमधील व्यक्तींच्या सुरक्षेसाठी 11 सुरक्षारक्षक तैनात केले जातात. यात 2 कमांडोज, 2 पीएसओंचा समावेश असतो.

वाय प्लस सुरक्षा –

वाय प्लस कॅटेगरीत एकूण 10 सशस्त्र कमांडो सुरक्षेसाठी तैनात असतात.

झेड सुरक्षा –

झेड लेव्हल सुरक्षेत एकूण 22 जणांचा ताफा महत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी तैनात केला जातो. यामध्ये 4 ते 5 एनएसजी कमांडोंचा समावेश असतो. राज्य सरकार अथवा सीआरपीएफकडून अशी अतिरिक्त सुरक्षा दिली जाते. या सुरक्षेत तैनात असलेल्या कमांडोंकडे सबमशीन गन, स्पेशल कम्युनिकेशन डिव्हाइज असतात. हे कमांडोंकडे मार्शल आर्ट्स तसेच विनाशस्त्र लढण्याचं कौशल्य असतं.

झेड प्लस सुरक्षा –

झेड प्लस लेव्हलमध्ये सुरक्षेत एकूण 36 जण तैनात असतात. यात 10 हून अधिक एनएसजी कमांडो असतात. एसपीजी खालोखाल हे दुसऱ्या दर्जाची महत्त्वाची सुरक्षा आहे.

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) –

एसपीजी सुरक्षेसंदर्भातील फारशी माहिती सार्वजनिक केली जात नाही. यासंदर्भात फार गुप्तता पाळली जाते. विद्यमान पंतप्रधानांबरोबरच माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांना एसपीजी सुरक्षा पुरवली जाते.

हेही वाचा :  Ajit Pawar Black and White: पार्थ पवार राजकारणात कधी सक्रीय होणार? अजित पवार म्हणाले "दुर्दैवाने आम्हाला..."



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सिनेस्टाइल पाठलाग करत उधळला डाव, गाडीतील वस्तू पाहून पोलिसही थक्क, तब्बल 2 कोटींचे…

Sandalwood Smuggling: भारताचे ‘लाल सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनाची खुलेआम तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा …

‘Double Digit पगारवाढीचा एकमेव मार्ग म्हणजे..’; Appraisals बद्दल कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सल्ला

Double Digit Appraisal Salary Hike: सध्या कॉर्पोरेटमध्ये वार्षिक आढावा म्हणजेच अ‍ॅन्यूअल रिव्ह्यू आणि पगारवाढ निश्चित करण्याचा …