शिंदे गटाच्या आमदारांमध्ये खरचं हाणामारी झाली का? उदय सामंत यांचा मोठा खुलासा

Maharashtra Industry Minister Uday Samant Exclusive Interview :  अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाल्यावर सरकारमध्ये शिंदे गटाची नाराजी असल्याची चर्चा रंगली आहे. शिंदे गटात अंतर्गत वाद सुरु झाले आहेत. मंत्रीपदावरुन देखील वाद होत आहेत. हे वाद इतेक विकोपाला गेले असून वर्षावर झालेल्या बैठकीत शिंदे गटाचे आमदार हमरीतुमरीवर आले. यांच्यात हाणामारी देखील झाल्याची चर्चा आहे.  शिंदे गटाच्या आमदारांमध्ये खरचं हाणामारी झाली का?  उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ‘झी 24 तास’च्या ‘Black and White’ या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीत याबाबत मोठा खुलासा केला आहे. 

शिंदे गटाबाबत अफवा पसरवल्या जात आहेत

मंत्रीपद न मिळालेले आमदार बैठकीत भांडले, मारामारी झाली अशी अफवा पसरवली जाते आहे. वाटल्यास जिथे बैठेक झाली तेथील CCTV कॅमेरे चेक करा, SIT लावा. अशा प्रकारे काहीही वाद झाले नाहीत. बालिश खेळ सुरु आहेत. विरोधकांकडून नकारत्मकता पसरवून वातावरण निर्मीती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमचे एकही आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात नाही. उलट त्यांच्या गटाचेच पाच ते सहा आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. 

हेही वाचा :  अशी पत्नी नको रे बाबा! मोबाईल हिसकावला म्हणून नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर ओतले उकळते तेल

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत

जे घडलेले नाही जे घडणारच नाही अशा प्रकाच्या अफवा पसरवल्या जात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावळकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत याचा खुलासा केला आहे.  एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार ही फक्त अफवा आहे. विकासासाठा अजित पवार महायुतीत सहभागी झाले आहेत. 

अजित पवार यांना नाराज होवून शिंदे गट भाजपसोबत आला. तेव्हा अजित पवार आम्हाला निधी देत नव्हते. तेव्हा मुख्यमंत्री कोण होते? हे सर्वांना माहित आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. यामुळे आता ते निधीवाटपात दुजाभाव होवू देणार नाहीत.  एकनाथ शिंदे सर्वांना निधी मिळवून देतील. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उत्तम राजकारणी आहेत. 

तेव्हाच्या आणि आत्ताच्या नेृत्वात फरक आहे

स्थानिक पातळीवर वाद आहेत. थोडे मदतभेद होतील पण वाद मिटतील. तेव्हाच्या आणि आत्ताच्या नेतृत्वात फरक आहे. समन्वय समितीच्या माध्यमातून वाद सोडवले जातील नेत्यांची समजूत काढली जाईल.  मंत्री मंडळाचा विस्तार नक्की होईल. कोणाला मंत्रीपद मिळेले याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. बच्चू कडू यांची नाराजी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूर करतील. 

हेही वाचा :  Pune Crime : 3 दिवसात 4 हजार कोटींचे एमडी ड्रग्स जप्त, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

शिवसेनेत कुणीही नाराज नाही

शिवसेनेत कुणीही नाराज नाही, विरोधकांकडून अफवा परसवण्याचं काम केलं जातंय अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलीय. अजित पवार आल्यानं सरकार आणखी मजबूत होईल असंही शिंदेंनी म्हंटलय. अजित पवारांच्या शपथविधीनंतर शिवसेना शिंदे गटात नाराजी असल्याचं बोललं जातंय. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टीकरण दिलंय. आपला एकही आमदार मातोश्रीच्या संपर्कात नाही असाही दावा शिंदेंनी केला. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …