Tunisha Sharma Death : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

Tunisha Sharma Last Rites : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) 24 डिसेंबर 2022 रोजी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. आज दुपारी तीन वाजता मीरा रोड येथे तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

तुनिषा शर्माच्या पार्थिवावर 25 डिसेंबर 2022 रोजी अंत्यसंस्कार होणार होते. पण तिची मावशी मुंबईत नसल्याने अंत्यसंस्कार पुढे ढकलण्यात आले. आता कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, तुनिषाच्या पार्थिवावर आज (27 डिसेंबर) अंत्यसंस्कार होणार आहे. कुटुंबियांच्या माहितीनुसार, तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी जगाचा निरोप घेतला. अंत्यसंस्कारादरम्यान चाहत्यांनी उपस्थित राहावं ही विनंती”. 

नेमकं प्रकरण काय? (Tunisha Sharma Suicide case) 

‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ (Ali Baba: Dastaan-E-Kabul) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेत तुनिषा शर्मा मुख्य भूमिकेत होती. वसईतील भजनलाल स्टुडियोत या मालिकेचं शूटिंग सुरू होतं. शनिवारी दुपारी तुनिषाने मेकअप रुममध्ये गळफात घेत आयुष्य संपवलं. संध्याकाळी 5 वाजता ही बाब सहकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यानंतर तिला वसईतीलच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 


तुनिषा अभिनेता मोहम्मद शिझानसोबत रिलेशनमध्ये होती. पण काही कारणाने त्यांचा ब्रेकअप झाल्याने ती निराश झाली होती. दोन दिवसांपासून ती नैराश्यात होती अशी तक्रार तुनिषाच्या आईने दिली होती. त्या तक्रारीवरून आम्ही शिझानच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून रात्री उशीरा अटक केली, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे.

हेही वाचा :  काजोलच्या ‘सलाम वेंकी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; आमिर खान देखील साकारणार महत्वाची भूमिका

संबंधित बातम्या

Tunisha Sharma Death : ब्रेकअपनंतर 15 दिवसांत नेमकं काय घडलं? ‘या’ कारणाने तुनिषा शर्माने संपवलं आयुष्य



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …