काजोलच्या ‘सलाम वेंकी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; आमिर खान देखील साकारणार महत्वाची भूमिका

Salaam Venky: अभिनेत्री काजोलच्या (Kajol) ‘सलाम वेंकी’ (Salaam Venkey) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. बालदिनाच्या निमित्तानं हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. काजोलसोबतच विशाल जेठवा  (Vishal Jethwa), राजीव खंडेलवाल, प्रकाश राज आणि अहना कुमरा यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेत्री रेवती यांनी केलं आहे. ‘सलाम वेंकी’ च्या ट्रेलरमधील डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. 

‘सलाम वेंकी’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आई आणि मुलाच्या जोडीची बाँडिंग दिसत आहे. ही आई आणि मुलाची जोडी ट्रेलरमध्ये अभिनेते राजेश खन्ना यांचा ‘जिंदगी लम्बी नहीं बड़ी होनी चाहिए बाबू मोशाय’ हा डायलॉग म्हणताना दिसत आहे.

ट्रेलरमध्ये दिसत आहे की सुजाता ही तिच्या मुलाची म्हणजेच व्यंकटेशची काळजी घेत असते. व्यंकटेश हा एका आजाराचा सामना करत असतो, असं ट्रेलरमध्ये दिसत आहे. सुजाता ही भूमिका काजोलनं साकारली आहे तर व्यंकटेश ही भूमिका अभिनेता विशाल जेठवानं साकारली आहे. या चित्रपटामध्ये आमिर खाननं देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 

पाहा ट्रेलर: 

हेही वाचा :  वऱ्हाडी वाजंत्री 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Reels


कधी रिलीज होणार सलाम वेंकी? 

सलमान वेंकी हा चित्रपट 9 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. काजोलनं या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. हे पोस्टर शेअर करुन काजोलनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘सलाम वेंकीचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये 9 डिसेंबरला  रिलीज होत आहे’ काजोलच्या या पोस्टला अनेक सेलिब्रिटींनी तसेच नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. काही युझर्सनं काजोलच्या पोस्टला कमेंट करुन काजोलला शुभेच्छा दिल्या आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

The Good Wife : ‘द गुड वाइफ’मधील काजोलचा फर्स्‍ट लुक आऊट; डिज्नी प्लस हॉटस्टारवर वेबसीरिज होणार प्रदर्शितSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …