ट्रॅड वाईफ म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड तुम्हाला माहीत आहे का

आपल्या गृहिणी अर्थात Home maker, wife असे शब्द नेहमीच कानावरून जात असतात. पण तुम्हाला ट्रॅड वाईफ हा शब्द माहीत आहे का किंवा हा शब्द कधी कानावरून गेलाय का? लगेच वेगवेगळा विचार करायला सुरूवात करू नका. थांबा जरा. याचा नक्की काय अर्थ आहे आणि हा ट्रेंड म्हणजे नक्की काय आहे याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ट्रॅड वाईफची व्याख्या काय आहे आणि याबाबत नक्की काय माहिती आहे हे तुम्ही जाणून घ्या. ट्रॅड वाईफ म्हणजे काही वेगळी संकल्पना नाही तर आता आपल्याकडची संकल्पनाच विदेशातही दिसून येत आहे ज्याला ट्रॅड वाईफ असं म्हटलं जातंय. मात्र ५० च्या दशकातील ही संकल्पना अमेरिकत खूपच जास्त गाजलेली होती. जाणून घ्या अधिक माहिती (फोटो सौजन्य – iStock)

ट्रॅड वाईफ ट्रेंडची माहिती

ट्रॅड वाईफ कोण आहे?

ट्रॅड वाईफ कोण आहे?

Trad Wife अर्थात पारंपरिक अशी पत्नी. घरातील जबाबदारी पेलणारी आणि जिला घरातील कामे करायला अधिक आवडतात आणि घर सांभाळायला आवडते अशी पत्नी. यालाच ट्रॅड वाईफ असे म्हटले जाते. विदेशात हा ट्रेंड आता पुन्हा सुरू झालेला दिसून येतोय.

हेही वाचा :  Huge Piece Of Sun Breaks: टेन्शन वाढवणारी बातमी! सूर्याचा तुकडा पडला; वैज्ञानिक आणि NASA ही संभ्रमात

Trad Wife चे वैशिष्ट्य

trad-wife-

५० व्या दशकातील अशी पत्नी जिला स्वयंपाकघरात काम करायला आवडते आणि घर सांभाळायला आवडते. मुलांना सांभाळून घर व्यवस्थित राखणे आणि आपल्या पतीसह आनंदाने राहणे हा एकमेव अशा पत्नीचा उद्देश दिसून येतो.

(वाचा – Couple Games जे तुमच्या नात्यात आणतील अधिक जवळीक, नातं टिकविण्यासाठी तुम्हीही घ्या या गेम्सची मदत)

Happy Homemaker

happy-homemaker

घर सांभाळणारी आनंदी गृहिणी अशी याची संकल्पना असून सध्या मुलांना दोन्ही पालकांचा वेळ मिळत नाही. त्यामुळे किमान आईचा अधिक वेळ त्याला मिळावा यामधून ही संकल्पना उदयाला आली असावी असं दिसून येतंय. घरात आनंदाने वेळ घालवणारी आणि आपल्या कुटुंबासाठी वेळ देणारी आई, पत्नी अशी ही संकल्पना पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये येतेय. अशा महिलेचे करिअर हे घराच्या अवतीभोवतीच घडताना दिसून येतेय.

(वाचा – Kangana Ranaut Birthday: अफेअर, ई-मेल आणि लिगल नोटीस, कंगना आणि हृतिकच्या नात्याचा झाला होता नाट्यमय शेवट)

अनेक महिलांना व्हायचे आहे Trad Wife

-trad-wife

अनेक महिला सध्या या ट्रेंडला पाठिंबा देत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी पश्चिमी देशांमध्ये यावरून दोन गट पडल्याचेही सोशल मीडियावर दिसून आले आहे. मात्र अनेक महिलांना आपल्या मुलांसाठी Trad Wife व्हायचे आहे. यामध्ये लाजण्यासारखे काहीही नसून अभिमानाची गोष्ट असल्याचेही अनेक महिलांना वाटतेय.

हेही वाचा :  अवकाळी पावसाच्या तडाख्यात अनेक पिके भुईसपाट, पुढील 2 दिवस गारपिटीसह पाऊस

(वाचा – धर्माची मर्यादा ओलांडून लिव्ह इन मध्येही राहिले, ४१ वर्षांचा रत्ना-नसिरूद्धीन शाहचा संसार देतोय नव्या पिढीला प्रेरणा )

महिला का देत आहेत Trad Wife ट्रेंडला पाठिंबा

-trad-wife-

ऑफिस आणि घर या दोन्ही गोष्टी सांभाळणे आणि होणारी कसरत यामुळे महिलांना सगळेच गृहीत धरताना केवळ भारतातच नाही तर अन्य देशांमध्येही दिसून येत आहे. मात्र भारतात हे प्रमाण अधिक दिसते. या गोष्टींमुळेच किमान एका गोष्टीत योग्य जबाबदारी घेऊन ती अधिक चांगली पार पाडता येईल म्हणून Trad Wife च्या संकल्पनेला अनेक महिलांचा पाठिंबा दिसून येतोय.

पश्चिमी देशातील ट्रेंड

पश्चिमी देशातील ट्रेंड

पश्चिमी देशात तर अनेक महिला रील्स आणि फोटो पोस्ट करून आपण या Trad Wife ट्रेंडमध्ये अधिक आनंदी असल्याचे सध्या पोस्ट करताना दिसून येत आहेत. आपल्या होममेकर होणे अधिक आवडत असल्याचेही अनेक महिलांनी म्हटले आहे.

तुमची आवड महत्त्वाची

तुमची आवड महत्त्वाची

मात्र या Trad Wife ट्रेंडमध्ये तुमची आवड आणि निवड महत्त्वाची ठरते. प्रत्येक महिलेला कोणती लाइफस्टाइल अधिक आवडतेय आणि ती कोणत्या गोष्टीची निवड करतेय हे महत्त्वाचे आहे. करिअर अथवा घर सांभाळणे अथवा या दोन्ही गोष्टी संतुलितरित्या सांभाळणे हे सर्वस्वी महिलांवर अवलंबून आहे.
मात्र काही ठिकाणी पुन्हा आपण प्रगतीकडून अधोगतीकडे जात आहोत अशा गोष्टींवर ठाम आहेत. पण हे सर्वस्वी मत महिलांचे आपले स्वतःचे असू शकते हे विसरून चालणार नाही.

हेही वाचा :  मुहूर्त न बघाताही 'या' मंदिरात करता येतो विवाह, महाराष्ट्रातील एकमेव मंदिर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …