स्वस्तात iPhone 14 खरेदी करण्याची आज शेवटची संधी; 32 हजारांची मिळतेय सूट

Flipkart Sale: iPhone 14 स्वस्तात खरेदी करण्याची आजची शेवटची संधी आहे. फ्लिपकार्ट बिग बिलयन डेज सेल 2023 15 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज संपणार आहे. हा सेल आज रात्री 12 पर्यंतच लाइव्ह असणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला iPhone 14 सीरीजचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करता येणार आहे. य वर्षातील सर्वात भन्नाट आयफोन डील असणार आहे. एक्सजेंच ऑफरसह ईएमआय ऑप्शन्स देण्यात आले आहेत. ज्यामुळं तुम्ही सगळ्यात कमी किंमतीत आयफोन 14 खरेदी करु शकणार आहात. 

आयफोन 14

फ्लिपकार्ट सेलमध्ये अॅपल आयफोन 14चा 128 जीबी मॉडलची किंमत 391150 रुपयांच्या एक्सचेंज ऑफरसह विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच, 69,990 रुपये किंमतीचा फोन 57,999 रुपयांच्या डिस्काउंटवर लिस्ट करण्यात आला आहे. 0 टक्के  ईएमआय आणि बँक ऑफर दिली जात आहे. iPhone 14मध्ये अल्ट्रा फास्ट प्रोसेसर सपोर्ट देण्यात आला आहे. 

आयफोन 14 प्लस

iPhone 14 Plus स्मार्टफोनचा 128 GB मॉडेल 79,999 रुपयांऐवजी 65,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच, यावर 41,150 रुपयांची कमाल एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. हा फोन बँक आणि ईएमआय पर्यायांसह फ्लिपकार्ट सेलमध्ये विक्रीसाठी ऑफर करण्यात आला आहे. फोनमध्ये 6.7 इंच सुपर रेटिना डिस्प्ले आहे. यात A15 बायोनिक चिपसेट आहे. फोनच्या मागील बाजूस दोन 12MP कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत. तसेच 12MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 

हेही वाचा :  WhatsApp चं स्टेटस २४ तासांनंतरही पाहता येणार, पाहा कसं असेल 'हे' खास फीचर

आयफोन 14 प्रो

iPhone 14 Pro ची मूळ किंमत1,29,900 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टवर 97,999 रुपयांना विक्रीसाठी ऑफर करण्यात आले आहे. फोनमध्ये 6.1 इंच सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 48MP+12MP+12MP रियर कॅमेरा सेन्सर आहे. तसेच 12MP फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोन A16 Bionic चिपसेट सह येतो. EMI आणि एक्सचेंज ऑफरसह फोन खरेदी करण्याची संधी दिली जात आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …