तीन मोठे लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने, विमानाच्या आकारापेक्षाही मोठे Asteroid, धोका किती?

Massive Asteroid To Pass By Earth: आज 27 जून रोजी तीन महाकाय आकाराचे लघुग्रह (Asteroid) जाणार आहेत. नासा वेळोवेळी अंतराळात होत असलेल्या बदलांची माहिती देत असते. यावेळी नासाने (Nasa) एक धोक्याचा इशारा दिला आहे. पृथ्वीच्या (Earth) जवळून तीन महाकाय लघुग्रह जाणार आहात. यातील २ लघुग्रह हे विमानाऐवढे मोठे आहेत तर एका लघुग्रहाचा आकार बसइतका मोठा आहे. 

नासाकडून अलर्ट

अवकाशात हे लघुग्रह सतत फिरत असतात. पण क्वचितच त्यातील एखादा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जातो. त्यावेळेस नासा किंवा अन्य रिसर्च सेंटरकडून अलर्ट देण्यात येतो. पृथ्वीजवळून आता एकाचवेळी तीन लघुग्रह जाणार असल्याचा इशारा केला आहे. या तिनही लघुग्रहांचा महाकाय आकारामुळं चिंता वाढली आहे. 

पृथ्वीजवळून जाणार लघुग्रह

आज पृथ्वीजवळून जाणाऱ्या पहिल्या लघुग्रहाचे नाव ‘Asteroids (2023 MH4)’ असं आहे. 42 फूटांचा हा लघुग्रह एखाद्या बसइतका अवाढव्य आकाराचा आहे. जेव्हा हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाईल तेव्हा दोघांमधील अंतर 10 लाख 40 हजार किलोमीटर इतकं असेल. नासाच्या म्हणण्यानुसार, पृथ्वीजवळून लघुग्रह जाण हे धोकादायक नसले तरी असे लघुग्रह पृथ्वीवर धडकू शकतात. एका लघुग्रहामध्ये एखादं शहर बेचिराख करण्याची क्षमता असते. काही करोडो वर्षांपूर्वी पृथ्वीवर डायनासोर होते मात्र लघुग्रह पृथ्वीवर धडकल्यामुळं त्याचं अस्तित्व नष्ट झालं, असं म्हटलं जातं. 

हेही वाचा :  Twitter Blue Tick : आतापर्यंत इतक्या ट्विटर यूजर्सनी गमावली ब्लू टिक, दिग्गजांमध्ये तुमचे अकाऊंट वाचले का?

पृथ्वीला धोका किती?

दरम्यान, पृथ्वीजवळून जाणाऱ्या दुसऱ्या लघुग्रहाचे नाव (2023 MS2 आहे. या लघुग्रहाचा अपोलोशी संदर्भ आहे. हा महाकाय लघुग्रह आणि पृथ्वीतील अंतर 38 लाख 10 किलोमीटर इतकं असेल. तर, तो 110 फूट इतका उंच असेल. तर, दुसऱ्या लघुग्रहाचे नाव (2023 M02) असं असून त्याची उंची 130 फूट आहे. त्याचं पृथ्वीपासूनचं अंतर 56 लाख 10 हजार किलोमीटर इतकं असेल. नासाकडून ही तिन्ही लघुग्रह पृथ्वीला धडकण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती दिली आहे. मात्र, तरीही त्यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

खगोलीय घटना, तज्ज्ञांचे स्पष्टीकरण

लघुग्रह पृथ्वीवर धडकण्याची शक्यता फार कमी असते. ही एक खगोलीय घटना आहे. अंतराळात लघुग्रह, धुमकेतू यांसारखे अनेक घटक त्यांच्या कक्षेत फिरत असताना पृथ्वीजवळ येऊ शकता. गुरुत्वाकर्षणामुळं पृथ्वीभोवतीच्या वस्तूही त्याकडे आकर्षित होतात. पण त्याचा पृथ्वीला धोका नसतो, असं तज्ज्ञ सांगतात.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …