Twitter Blue Tick : आतापर्यंत इतक्या ट्विटर यूजर्सनी गमावली ब्लू टिक, दिग्गजांमध्ये तुमचे अकाऊंट वाचले का?

Twitter Blue Tick News: एलन मस्क यांच्या मालकीची मायक्रो-ब्लॉगिंग साइट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शुक्रवारी गोंधळ झाला.  twitter ने अनेकांची Blue Tick काढून टाकली आहे. यात अनेक मोठ्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. भारतात, ब्लू व्हेरिफाईड स्टेटस मिळवण्यासाठी दरमहा 900 रुपये भरावे लागणार आहेत. एलन मस्क यांनी आधीच जाहीर केले होते की, यापुढे ब्लू टिक्स  काढून टाकली जाईल. आतापर्यंत लाखो ट्विटर यूजर्सची ब्लू टिक्स हटविण्यात आली आहे.

ट्विटरने काही सेलिब्रेटी आणि संस्थांना दिलेले ब्लू टिक हटवले आहे. यामध्ये अभिनेता अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार या सेलिब्रेटींसह सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली यांचा समावेश आहे. राहुल गांधी, केजरीवाल, योगी आदित्यनाथ यांच्या नावासमोरील ब्लू टिक हटवले गेले आहे.

ब्लू टिकसाठी ज्यांनी पैसे मोजलेत त्यांच्याच प्रोफाईलवर ब्लू टिक कायम राहणार असल्याचं ट्विटरनं स्पष्ट केलंय. त्यामुळे आतापर्यंत ब्लू टिकसाठी मिळणारी मोफत सुविधा बंद करण्यात आलीय. आता या सर्वांना ब्लू टिकसाठी पुन्हा अर्ज करावा लागेल आणि त्यासाठी पैसे मोजावे लागतील. ब्लू टिकसाठीचे पैसे विभागानुसार वेगवेगळे आहेत. भारतात IOS साठी महिन्याला 900 रुपये, वेबसाठी 650 रुपये मोजावे लागतील. तेच वर्षाला IOS साठी 9400 आणि Android युझर्ससाठी महिन्याला 900 आणि वर्षाला 9400 रुपये मोजावे लागणारेत. 

हेही वाचा :  Salman Khan Birthday : 40 कोटी यूजर्सचा डाटा लीक! Salman Khan च्याही अकाउंटमध्ये घुसखोरीचा दावा

4 लाख यूजर्सकडून ब्लू टिक काढून घेतले

4 लाखांहून अधिक यूजर्सचे ब्लू टिक काढून टाकण्यात आले आहे. काही ख्यातनाम व्यक्तींना एलन मस्क यांनी ट्विटर ब्लू सदस्यत्वाची ऑफर दिली आहे. ते म्हणाला, मी वैयक्तिकरित्या विल्यम शॅटनर, लेब्रॉन जेम्स आणि स्टीफन किंग यांना पैसे देत आहे.

एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर कंपनीला आर्थिक संकटाचा सामना करावा होता. हे आर्थिक संकट भरुन काढण्यासाठी हे पाऊल उचल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. यातील मोठा बदल म्हणजे ‘ब्लू टिक’ सबस्क्रिप्शनसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

एलन मस्क यांनी दिली ही माहिती 

मायक्रोब्लॉगिंग साइट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी यापूर्वीच याची घोषणा केली होती. जर ब्लू टिक लावायची असेल तर त्यासाठी मासिक शुल्क भरावे लागेल, असा आग्रह धरला होता. मासिक शुल्क न घेणार्‍यांची ब्लू टिक काढली जाईल. ते म्हणाले की, 20 एप्रिल 2023 नंतर ज्या खात्यांनी अद्याप सशुल्क सदस्यता घेतलेली नाही अशा खात्यांमधून ब्लू टिक्स हटविल्या जातील. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …