‘…तर पोलिसांना कारवाई करावी लागेल’, स्क्रिप्ट कोणाची? देवेंद्र फडणवीस म्हणतात ‘सागर बंगल्यावर जर…’

Devendra Fadnavis On Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, अशा मागणीसाठी सगेसोयरेच्या मागणीवर ठाम असलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघाती टीका केली. जालन्यातील अंतरवाली सराटीत पत्रकार परिषदेत यामुळे मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं. मला विष देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी सागर बंगल्यावर येण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर अंतरवाली सराटीत मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं. अशातच आता मनोज जरांगेंच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मनोज जरांगेंवर कारवाई करणार का? असा सवाल देवेंद्र फडणवीसांना विचारला गेला. तेव्हा, सागर बंगला हा सरकारी बंगला आहे, तिथं कोणालाही अडवलं जाणार नाही. जरांगेंना कुठली सहानुभूती घेयचीये, मला माहित नाही. त्यांचे आरोप धादांत खोटे आहेत. मराठा आरक्षण मी हायकोर्टात टिकवलं. मी सर्वोच्च न्यायालयात देखील आरक्षण टिकवलं. माझ्यानंतर जे मुख्यमंत्री आले, त्यांना ते टिकवता आलं नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

जी स्क्रिप्ट आत्तापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते, पवार साहेब बोलत होते, तीच स्क्रिप्ट, तेच विषय जरांगेंनी का मांडावे? असा प्रश्न आहे. याच्याच्या पाठीशी काय आहे? मुख्यमंत्र्यांनी जे काही सांगतं, त्याची काही कल्पना आमच्याकडे आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. कुणीही आंदोलन केलं तर आमची काहीही हरकत नाही, परंतू कायदा आणि सुव्यवस्था जर बिघडवली तर कारवाई करावी लागेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :  वय 75 वर्ष, उत्साह विशीतल्या तरुणासारखा; किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात आजीबाईंनी वेधले लक्ष

दरम्यान, 1 सीएम, 2 डीसीएम या तिघांपैकी जनरल डायर कोण? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी केलाय. जरांगेंच्या आरोपानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केलीय. जनरल डायर कोण, हे समजायला पाहिजे. वरिष्ठांच्या आदेशाशिवाय पोलीस लाठीचार्ज करणार नाहीत, असंही ते म्हणाले. तर मनोज जरांगे हा आधीपासूनच दिशाहीन आहे. जो दिशाहीन आहे तो दिशा काय ठरवणार? अशा शब्दात भुजबळांनी जरांगेंवर टीका केलीय. सगेसोयरेबाबत सरकार अंमलबजावणी करत नसल्याने आज जरांगेंनी निर्णायक बैठक बोलावलीय. या बैठकीत पुढची दिशा ठरवली जाणार आहे. या बैठकीवरून भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधलाय. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘पत्नीसोबत अनैसर्गिक शरीर संबंध गुन्हा नाही’, कोणत्या प्रकरणात हायकोर्टाने दिला निर्णय?

Unnatural Intercourse: पती पत्नीमध्ये अनेक कारणांवरुन वाद होत असतात. हे वाद टोकाला गेले की कोर्टाची …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …