राज्यात अनेक भागात वळिवाच्या पावसाचा इशारा, पुढील दोन ते तीन दिवस महत्त्वाचे

Warning of heavy rain in Maharashtra : राज्यात मान्सूनचे आगमन लांबलं असलं तरी वळिवाचा पाऊस सध्या अनेक भागात जोरदार होत आहे. आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वळिवाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहील. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

पावसासह सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे. एकीकडे राज्यात वळिवाचा पाऊस असतानाच काही भागात तापमानही वाढण्याची शक्यता आहे. उद्या आणि परवा काही भागात तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. पुणे आणि परिसरात तापमानात फारसा फरक होणार नाही, तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. 

अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे या वादळाच्या प्रभावाखाली दक्षिणपूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्रही तयार झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचा जोर आता वाढणार आहे. मात्र, तो कधी पडेल याचा अंदाज नाही. सध्या महाराष्ट्रात सुरु असणारा पाऊस हा मान्सून नाही तर तो वळिवाच्या पाऊस आहे, असे सांगण्यात येत आहे.

मान्सूनची वाट पाहावी लागणार

मान्सूनसाठी अजूनही वाट पाहावी लागणार आहे. मान्सूनचे आगमन चांगलेच लांबले आहे. केरळमध्ये अजूनही मान्सून दाखल झालेला नाही. 4 जूनला केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज मान्सूनने चुकवला आहे. 10 जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज होता, मात्र आता राज्यात 13 ते 15 जून दरम्य़ान पाऊस सुरू होण्याचा अंदाज आहे. 

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील चक्रावाताच्या स्थितीमुळे मान्सूनची प्रगती खुंटलेली आहे.  पुढील 4 ते 5 दिवसांनी केरळमध्ये मान्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण होईल. दक्षिण अरबी समुद्रात चक्रावाताची स्थिती आज अधिक तीव्र होईल, त्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल. नंतर दोन दिवसांत हे कमी दाबाचं क्षेत्र उत्तरेकडे सरकेल आणि त्यानंतरच मान्सूनसाठी योग्य स्थिती निर्माण होईल. अर्थात मान्सूनचं आगमन लांबलं असलं तरी पावसाच्या प्रमाणावर त्याचा परिणाम होणार नाही असं सांगितलं जात आहे. 

हेही वाचा :  घरात घट्ट आणि गोड दही बनविण्याच्या सोप्या ट्रिक्स



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …