शाहरुख खानच्या घनदाट केसांचे रहस्य उघड, हा एक फॉर्म्युला वापरुन 57 वर्षी देखील करतोय मुलींच्या हृदयावर राज्य

वयाच्या 57 वर्षी देखील शाहरुख खानची जादू कायम असलेली पाहायला मिळते. त्याचे मुऊ मुलायम केस आणि त्याची अदा अनेकांना भुरळ पाडते. आज त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च झाला आहे. अशात सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुखने त्याच्या काळ्याभोर केसांचे रहस्य सांगितले आहे. त्याच झालं असं की एका मुलाखतीमध्ये शाहरुखला त्याच्या सुंदर केसांचे रहस्य विचारले गेले. अनेक चाहत्यांच्यावतीने त्याला हा प्रश्न विचारला गेला. यावेळी शाहरुख खानने दिलेले उत्तर ऐकून तुम्ही देखील आश्चर्य व्यक्त कराल. (फोटो सौजन्य : @iamsrk)

​हा एक फॉर्म्युला वापरुन मिळवले घनदाट केस

या मुलाखतीमध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना शाहरुख म्हणाला की मी केसांसाठी कोणताही शॅम्पू वापरत नाही. ज्या उत्पादनांमध्ये केमिकल आहेत अशा गोष्टींपासून चार हात लांब राहतो. शाहरुखचे हे उत्तर ऐकून अनेकांनी भुवया उंचावल्या. (वाचा : – Juice for Glowing Skin : वेटलॉस सोबतच डाग विरहित, चमकदार त्वचा हवी असेल तर हे ४ ज्युस ठरतील वरदान)

हेही वाचा :  नितीन गडकरी यांच्या हस्ते नरेंद्र महाराज इन्स्टिट्यूट कॉलेज इमारत कोनशिलेचे अनावरण

​केमिकलयुक्त शॅम्पूने केसांचे होते नुकसान

शॅम्पू आणि केसांना लावले जाणाऱ्या अनेक गोष्टीमध्ये केसांना हानिकारक असणारी केमिकल असतात. ही केमिकल्स केसांचा पोत खराब करतात. त्याचप्रमाणे या गोष्टींमुळे केस गळतीची समस्या देखील निर्माण होऊ शकते. (वाचा :- मुलीच्या प्लास्टिक सर्जरीच्या दाव्यावर काजोल स्पष्टच बोलली म्हणाली… )

​केस धुण्यासाठी फक्त पाण्याचा वापर

शाहरुखच्या सांगण्याप्रमाणे केस धुण्यासाठी तो फक्त पाण्याचा वापर करतो. तुम्ही देखील असेच करा असा सल्ला देखील त्याने यावेळी दिला आहे. त्याचप्रमाणे ज्या उत्पादनांमध्ये केमिकल आहेत असे उत्पादने वापरुच नका असा सल्ला त्याने दिला आहे. (वाचा :- तुमच्या ‘या’ एका चुकीमुळे वाढू शकतात तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, आजच सोडून द्या ही वाईट सवय)

असा निवडा शॅम्पू

​डॉक्टरांचे मत

यावर त्वचारोगतज्ञ डॉ आंचल यांनी सांगितले की शॅम्पू हा तुमच्या टाळूवरील त्वचा साफ करते. हे काम सोडून शॅम्पू कोणतेच काम करत नाही. त्यामुळे शक्यतो सौम्य शॅम्पू वापरण्याकडे भर द्या. (वाचा :- बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी कॉस्मेटिक सर्जरीने वाढवले सौंदर्य, चौथं नाव वाचून हडबडून जाल )

असा तयार करा शॅम्पू

हेही वाचा :  सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांची सूचना

घरच्या घरी आयुर्वेदिक शॅम्पू कसा तयार करावा?

  • घरच्या घरी आयुर्वेदिक शॅम्पू कसा तयार करावा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर द योगच्या हंसा योगेंद्र यांनी काही उपाय सांगितले आहेत.
  • घरच्या घरी शॅम्पू तयार करण्यासाठी तुम्ही रिठ्याचा वापर करु शकता. यासाठी रिठा पाण्यात उकळून घ्या
  • या उकळलेल्या रिठ्याला रुमालामध्ये बंधून त्यातील रस काढून घ्या
  • आता या रसामध्ये शिकेकाई पावडर टाकून तुम्ही याचा वापर शॅम्पू म्हणून करु शकता
  • तांदळाच्या पाण्याचा वापर करुन देखील तुम्ही सुंदर केस मिळवू शकता. (वाचा :- मुलीच्या प्लास्टिक सर्जरीच्या दाव्यावर काजोल स्पष्टच बोलली म्हणाली… )



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …