4400 वर्षानंतर उघडणार इजिप्तच्या रहस्यमयी पिरॅमिडचा गुप्त दरवाजा; जगासमोर येणार मोठं सत्य

Egypt Pyramid :  इजिप्त… असं नाव घेतलं की डोळ्यासमोर येतात पिरॅमिड.  इजिप्तचे पिरॅमिड हे संपूर्ण जगासाठी मोठं रहस्य आहे. इजिप्तच्या पिरॅमिड संदर्भातील अनेक रहस्य अद्याप उलगडलेली नाहीत.  इजिप्तमध्ये अनेक रहस्ययी पिरॅमिड आहेत. यापैकीच एक आहे ते साहुराचा पिरॅमिड. साहुरा पिरॅमिडमधील एका खोलीचा दरवाजा 4400 वर्षानंतर उघडणार आहे. या बंद दरवाजाआड दडलेली अनेक रहस्य उलगडणार आहेत.

इजिप्शियन फारो सहुरा याच्यासाठी सुमारे 4400 वर्षांपूर्वी बांधला  होता हा पिरॅमिड

पिरॅमिड इजिप्शियन फारो अर्थात राजा सहुरा याच्यासाठी सुमारे 4400 वर्षांपूर्वी हा पिरॅमिड बांधला गेला होता. या रहस्ययी पिरॅमिडमधील बंद असलेली खोली उघडण्यात येणार आहे. यामुळे पिरॅमिडचे संरचनात्मक मूळ आणि पिरॅमिडच्या आत फारो सहुरा संदर्भातील अनेक रहस्य उलगडणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. डेली स्टारने याबाबतचे वृत्त दिले आहे. ज्युलियस-मॅक्सिमिलियन्स-विद्यापीठाची एक टीम साहूराच्या पिरॅमिड बाबत संशोधन करत आहे. 

हेही वाचा :  शौचाच्या जागी गाठ व ब्लीडिंग होते? मुळव्याध आहे की कोलोरेक्टल कॅन्सरची सुरूवात, असा ओळखा दोन्ही लक्षणांतला फरक

संशोधक गुप्त दरवाजा उघडणार 

साहुरा  पिरॅमिडवर संशोधन करणाऱ्या टीमने या पिरॅमिडमधील गुप्त दरवाजे शोधले आहेत. 3D लेझर स्कॅनिंग आणि क्षेत्राचे नकाशे यांच्या मदतीने ते पिरॅमिडच्या आत असलेल्या आठ खोल्यांपैकी एक गुप्त मार्ग उघडू उघडण्याचा प्रयत्न करत आहेत. या गुप्त दरावाजाआड अनेक रहस्य दडलेली आहेत. हे गुप्त दरवाजे उघडल्यास साहूरा पिरॅमिडशी सबंधीत अनेक रहस्य उलगडण्यास मदत  होणार आहे. 

पिरॅमिडमध्ये जतन करण्यात आल्यात राजा महारांच्या ममी

इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये राजा महारांच्या ममी जतन करण्यात आल्या आहेत. इजिप्तमध्ये राजे-राण्यांचे मृतदेह रासायनिक प्रक्रिया करून कायमस्वरुपी जतन करून ठेवले जायचे. याला ‘ममी’ म्हणतात. अभ्यासकांना ममीफिकेशन, त्याचा धार्मिक विधी, पद्धती आणि वेगवेगळ्या टप्प्यांबाबत अजूनही संशोधन करत आहेत. 

इजिप्तमध्ये 2 हजार 300 वर्षापूर्वीच्या ममीमध्ये सोन्याचा खजिना

इजिप्तमध्ये 2 हजार 300 वर्षापूर्वीच्या ममीमध्ये सोन्याचा खजिना सापडला होता. सोन्याचं हृदय, सोन्याची जीभ आणि 49 सोन्याच्या ताईत आढळून आल्या आहेत. पिरॅमिड आणि त्यातील ममी यांच्यावर संशोधन सुरू असताना हे सोनं सापडलंय. ही ममी किशोरवयीन मुलाची असल्याचं संशोधकाचं म्हणण आहे.

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …