‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट बनला तसा ‘लखीमपूर फाईल्स’ही बनायला हवा; अखिलेश यादवांची मागणी | If Kashmir Files can be made Lakhimpur Files also needs to be produced Akhilesh Yadav- vsk 98


द कश्मीर फाईल्स हा चित्रपट १९९० च्या काळातल्या काश्मिरी पंडितांच्या समस्यांवर भाष्य करणारा आहे. हा चित्रपट टॅक्स फ्री करणाऱ्या राज्यांपैकी उत्तर प्रदेश हे एक राज्य आहे.

‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून सध्या देशातलं राजकारण ढवळून निघालं आहे. पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांनी या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला आहे. विरोधकांनी मात्र यावर टीका केली आहे. ‘द कश्मीर फाईल्स’ जर बनू शकते तसंच ‘लखीमपूर फाईल्स’ असा चित्रपटही बनायला हवा अशी मागणी करत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपावर टीका केली आहे.

जर ‘कश्मीर फाईल्स’ असा चित्रपट बनू शकतो तर जिथं जीपच्या चाकांखाली शेतकऱ्यांना चिरडण्यात आलं तिथला लखीमपूर फाईल्स असाही चित्रपट बनायला हवा, असं अखिलेश यादव म्हणाले आहेत. अखिलेश काल सीतापूर जिल्ह्यात पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना द कश्मीर फाईल्स या चित्रपटाविषयीचं त्यांचं मत विचारण्यात आलं होतं.

विवेक अग्निहोत्री यांचं दिग्दर्शन असलेला ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट १९९० च्या काळातल्या काश्मिरी पंडितांच्या समस्यांवर भाष्य करणारा आहे. हा चित्रपट टॅक्स फ्री करणाऱ्या राज्यांपैकी उत्तर प्रदेश हे एक राज्य आहे. या व्यतिरिक्त मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, हरयाणा, गोवा, त्रिपुरा आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. ही सर्व राज्ये भाजपाशासित आहेत.

हेही वाचा :  मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांना अडीच कोटींचा गंडा, पोलिसांकडून एकाला अटक!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …

ATM मधून फाटलेल्या नोटा निघाल्यात? घाबरू नका, ‘या’ पद्धतीने मिळवा कोऱ्या करकरीत नोटा

Damaged Note Exchange RBI Rule: एटीएममध्ये पैसे काढायला गेल्यानंतर अनेकदा त्यातून फाटलेले नोटा येतात. एटीएममधून …