पोटावर लटकणारी चरबी असू शकते कॅन्सरचे कारण, पाहा तज्ज्ञांचे मत

दरवर्षी मार्च हा महिना जागतिक कोलोरेक्टल कॅन्सर जागरुकता महिना म्हणून साजरा केला जातो. कॅन्सरच्या या प्रकारात मोठ्या आतड्याच्या किंवा गुदाशयाच्या कोणत्याही भागात धोकादायक ट्यूमर तयार होऊ लागतो. या ट्यूमरचे रुपांतर कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये होते. पण तुम्हाला माहित आहे का या जीवघेण्या आजाराचा संबंध पोटावरील चरबीशी आहे. तुमच्या पोटावरील चरबी जर वाढत असेल तर त्यावर दुर्लक्ष करू नका. यामुळे जीवघेणा कर्करोग निर्माण होऊ शकतो. कोलोरेक्टल कर्करोगचे पोटाभोवती चरबी जमा होणे हे लठ्ठपणाचे लक्षण आहे. तसेच, यामुळे तुमचे वजन जास्त प्रमाणात वाढू शकते. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) म्हणते की लठ्ठपणा आणि जास्त वजन यामुळे कोलोरेक्टल कर्करोग होऊ शकतो. (फोटो सौजन्य :- iStock)

मोठ्या आतड्यात ट्यूमर कसा ओळखायचा?

मोठ्या आतड्यात ट्यूमर कसा ओळखायचा?

कोणताही आजार होण्यापूर्वी आपले शरीर त्याची काही लक्षणे आपल्याला दर्शवते. कॅन्सरसुद्ध एका रात्रीत होत नाही. कर्करोगाची कोणतीही चाचणी करण्यापूर्वी डॉक्टर रुग्णामध्ये काही लक्षणे पाहतात.

हेही वाचा :  दोन सख्खे भाऊ, एक कुणबी-एक मराठा, मनोज जरांगेंचा दावा खरा ठरला

(वाचा :- Reduce Period Pain: मासिक पाळीत होणाऱ्या असह्य वेदनांपासून ही 20 रुपयांची गोष्ट देईल आराम) ​

कोलोरेक्टल कॅन्सरची लक्षणे

कोलोरेक्टल कॅन्सरची लक्षणे

या कॅन्सरशी संबंधित तज्ज्ञांची काही मते अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्यांच्या मते, कोलोरेक्टल कॅन्सरमुळे अनेक दिवस अतिसार, बद्धकोष्ठता आणि सैल मल यांसारख्या पोटाच्या समस्या असू शकतात याशिवाय, गुदाशयातून हलका लाल रक्तस्त्राव, रक्तामुळे मल गडद रंगचे येणे, ओटीपोटात दुखणे, अशक्तपणा आणि थकवा यासह इतर लक्षणे देखील दिसू शकतात. त्यामुळे तुम्हाला जर अशी लक्षणे असतील तर ती हलक्यात घेऊ नका.

(वाचा :- Ways to Reduce Uric Acid: ना औषध, ना पथ्यपाणी फक्त या 8 गोष्टी करा, युरीक अ‍ॅसिड रक्तातूनच खेचून वेगळे होईल)

झपाट्याने वजन होते कमी​

झपाट्याने वजन होते कमी​

मोठ्या आतडे आणि गुदाशयाच्या कर्करोगात रुग्णाचे वजन काहीही न करता कमी होऊ लागते. Cancer.org च्या मते या कर्करोगात शरीराला अवश्यक असणारे कॅलरीजचे प्रमाण वाढते तेव्हा रुग्णांचे वजन झपाट्याने कमी होते. त्यामुळे तुमच्या वजनात तफावत निर्माण झाल्यास
लगेच डॉक्टरांना भेट द्या.

(वाचा :- भूक आणि तहान लागण्याव्यतिरिक्त महिलांमध्ये दिसतात मधुमेहाची ही ६ लक्षणे, आजच सावध व्हा)​

हेही वाचा :  भारतात शाकाहारी जास्त की मांसाहारी? आश्चर्यकारक आकडेवारी समोर

पोट एकाच वेळी रिकामे न करणे

पोट एकाच वेळी रिकामे न करणे

एकदा शौचाला गेल्यावर पोट रिकामे वाटत नसेल आणि पुन्हा आतड्याची हालचाल करण्याची गरज वाटत असेल तर काळजी घ्या. कारण, हे देखील कोलोरेक्टल कॅन्सरचे प्रमुख लक्षण असू शकते.

(वाचा :- घाण आणि कमकुवत नसांना साफ करते हे एक चमत्कारी फळ, खुद्द पोषणतज्ज्ञांनी सांगितले फायदे) ​

या सवयींमुळे लठ्ठपणा आणि कोलोरेक्टल कॅन्सर वाढतो

या सवयींमुळे लठ्ठपणा आणि कोलोरेक्टल कॅन्सर वाढतो
  • फळे आणि भाज्या कमी खाणे
  • शारीरिक हालचालींचा अभाव
  • फायबर कमी आणि जास्त चरबीयुक्त आहार घेणे
  • दारू पिणे इ.(टिप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …