‘मी परत येईन..’ म्हणत अर्ध्या रात्री घर सोडून गेली मुलगी, तब्बल 4 वर्षांनी आई-बाबांनी जे पाहिलं त्यावर विश्वासच बसेना

14 year old girl: आई वडीलांचे नेहमीच आपल्या लहान मुलांवर लक्ष असते. विशेषत: मुलगी असेल तर ती जशी हळुहळू मोठी होते, तशी आई वडिलांना अधिक काळजी वाटते. तिला काही दुखापत होऊ नये, तिची कोणी फसवणूक करु नये, असे विविध विचार सतत त्यांच्या मनात येत असतात. तरीही काही अनपेक्षित घटना त्यांच्या आयुष्यात घडतात. एका कुटुंबात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

एक 14 वर्षांची मुलगी घर सोडून अचानक निघून गेली. का गेली? कुठे गेली? कोणासोबत गेली? काहीच माहिती नाही. अ‍ॅलिसिया नावेरो असे या मुलीचे नाव असून हे कुटुंब अमेरिकेतील अ‍ॅरिझोना येथे राहते. अ‍ॅरिझोना आपल्या 15 व्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी रात्री गायब झाली होती. हे कळताच तिच्या पालकांना खूप मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पण गेल्या 4 वर्षांपासून मुलीबद्दल काहीच माहिती त्यांना मिळू शकली नव्हती. 

15 सप्टेंबर 2019 रोजी अ‍ॅलिसिया अवघ्या 14 वर्षांची होती, तेव्हा ती तिच्या पालकांना न सांगता रात्रीच्या अंधारात घरातून निघून गेली. सकाळी घरच्यांना जाग आली तेव्हा त्यांना अ‍ॅलिसियाच्या हाताने लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यात लिहिले होते- ‘मी जात आहे. परत येईन, मी शपथ घेते. मला क्षमा करा. त्यानंतर चार वर्षे अ‍ॅलिसियाची कोणतीही बातमी आली नाही. पोलिसांनाही तिचा शोध लागला नाही.

हेही वाचा :  'मला आमंत्रण दिलं नाही कारण...', प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर मराठमोळ्या अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष

आता 4 वर्षानंतर जे घडले ते तिच्या आईवडिलांसाठी चमत्कारापेक्षा कमी नव्हते. तब्बल 4 वर्षांनी त्यांची मुलगी घरी सुखरुप परतली आहे. अ‍ॅलिसिया सापडल्यानंतर तिची आई जेसिका नुनेझने फेसबुकवर एक भावनिक पोस्टचा व्हिडीओ शेअर केला. ‘हे त्या सर्व लोकांसाठी आहे ज्यांचे प्रियजन बेपत्ता आहेत. तुमच्यासाठी हे प्रकरण उदाहरण ठरावे अशी माझी इच्छा आहे. कधीच आशा सोडू नका, नेहमी लढा. कारण कधी कधी चमत्कार घडतात.’ असे तिने व्हिडीओत म्हटले.

अलीकडेच, अ‍ॅलिसियाने स्वतः पोलिस स्टेशन गाठले आणि तिचे नाव मिसिंग लिस्टमधून काढून टाकण्यास सांगितले. या प्रकरणात, ग्लेनडेल पोलिस विभागाने सांगितले की अ‍ॅलिसिया  नवारो आता 18 वर्षांची आहे, कॅनडाच्या सीमेपासून 40 मैल अंतरावर असलेल्या मोंटानामधील एका छोट्या गावात ती सापडली. पोलिस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर तिने अधिकाऱ्यांना सांगितले की मी तीच मुलगी आहे जी सप्टेंबर 2019 मध्ये बेपत्ता झाली होती.

अ‍ॅलिसिया नवारोचा शोध लागला आहे. तो पूर्णपणे सुरक्षित आणि निरोगी आहे. ती आनंदी दिसतेय, अशी माहिती जोस सॅंटियागो नावाच्या अधिकाऱ्याने माध्यमांना यासंदर्भात माहिती दिली.

घरातून बेपत्ता होण्यापूर्वी लिहिले होते पत्र

मुलगी कुठे होती आणि कशी परत आली याचा सध्या शोध सुरु असल्याचे ग्लेनडेल पोलिसांनी सांगितले.  मुलगी मोंटानाला कशी पोहोचली आणि ती गेल्या चार वर्षांपासून कोणासोबत राहत होती याचा तपास आम्ही करत आहोत. असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे अजून सापडलेली नाहीत, असेही यावेळी सांगण्यात आले.

हेही वाचा :  Viral News : आईने तोडला मुलीचा संसार, जावयासोबत हनीमून साजरा करत राहिली गरोदर अन् मग

अ‍ॅलिसिया तिच्या इच्छेने घरातून पळून गेली होती. ती तपासात सहकार्य करत आहे. आपल्याला कोणीही इजा केली नसल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …