पुण्यातील फ्लॅटमध्ये हात-पाय बांधलेल्या अवस्थेत सापडले पती-पत्नीचे मृतदेह, गूढ कायम

Pune News Today: लोहगाव परिसरातील एका बंद घरात पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले आहेत. पतीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत तर पत्नीचा बेडवर झोपलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. पत्नीचा हात-पाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान हा प्रकार खुनाचा आहे की आत्महत्येचा, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाहीये. 

किरण महादेव बोबडे (वय 23), आरती किरण बोबडे (वय 20 दोघे राहणार रा. वडगाव शिंदे रोड,लोहगाव) अशी दोघांचे नावे आहेत. ही घटना सोमवारी (दि.6) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास येथील लोहगाव वडगावशिंदे रोड लेक व्ह्यू सिटी या सोसायटीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घरातून दुर्गंधी येत असल्याचे घरमालक प्रशांत यादव यांच्या निदर्शनास आले. घरमालक वरच्या मजल्यावर राहत होते तर तर बोबडे दाम्पत्य खालच्या मजल्यावर राहत होते. त्यांनी याबाबत पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता खोलीचा दरवाजा बंद होता. अनेकदा प्रयत्न करुनही दरवाजा उघडला नाही. त्यामुळं पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला.

हेही वाचा :  दारूच्या नशेत आईने २ महिन्याच्या बाळासोबत केला धक्कादायक प्रकार

पोलिसांना किरणचा मृतदेह छताच्या हुकला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला तर पत्नी आरती ही बेडवर मृत अवस्थेत सापडली. तिचा मृतदेह कुजण्यास सुरूवात झाली होती. शनिवारी सकाळपासून त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद होता. अंदाजे दोन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे

पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सुचना दिल्या आहेत. त्यानंतर पंचनामा झाल्यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते. किरण हा पोस्टात कंत्राटी नोकरी करत होता. तो मुळचा माजलगाव बीड येथील राहणार आहे. तर पत्नी आरती ही येरवड्यातील असून एका खासगी बँकेत नोकरी करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

काही महिन्यांपूर्वीच किरण आणि आरती यांचा विवाह झाला होता. पाच महिन्यांपासून ते या ठिकाणी भाड्याने राहण्यासाठी आले होते. मात्र, अशा पद्धतीने त्यांचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नेमके काय घडले हे समोर येईल. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

हेही वाचा :  14 वर्षांच्या मुलाला किडनॅप केले, पण एक चूक महागात अन् पुणे पोलिसांच्या जाळ्यात सापडले



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …