योगींच्या राज्यात पंचांगानुसार होणार पोलिसांची नियुक्ती! UP च्या डीजीपींनी सांगितलं यामागील कारण

UP Police Will Use Panchang For Posting: योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश राज्यामध्ये आता पोलीस कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या पंचांगाप्रमाणे होणार आहे. राज्याचे पोलीस महानिर्देशक (डीजीपी) विजय कुमार यांनी आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना हिंदू पंचांगानुसार चंद्राच्या कलांनुसार कर्मचारी नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच डीजीपींनी लोकांनाही याच आधारे अधिक सतर्क राहण्यास सांगितलं आहे. विजय कुमार यांनी 14 ऑगस्ट रोजी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाठवलेल्या परिपत्रकामध्ये, चंद्राच्या कलांच्या आधारे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. चंद्राच्या कला कशा असतील हे जाणून घेण्याची सर्वात सोपी पद्धत हिंदू पंचांग असल्याचंही विजय कुमार यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे परिपत्रकात?

विजय कुमार यांनी जारी केलेल्या परिपत्रकामध्ये सविस्तरपणे याबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. सोमवारी विजय कुमार यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. सामान्य लोकांनीही हे जाणून घेणं गरजेचं आहे कारण यामुळे गुन्हेगार कधी सक्रीय असतात हे समजू शकतं असं विजय कुमार यांनी म्हटलं आहे. कुमार यांनी एका तक्त्याच्या माध्यमातून आपलं तर्क मांडताना कोणत्या तारखेला चंद्र किती वाजता उगतो आणि किती वाजता मावळतो हे दाखवलं आहे. चंद्राच्या कलांवर कधी पूर्ण अंधार असतो आणि कधी कमी अंधार असतो हे निश्चित करता येतं असंही ते म्हणाले.

हेही वाचा :  Gold Rate: लग्नसराईत सर्वसामान्यांना दिलासा! सोनं 'इतक्या' रुपयांनी स्वस्त, पाहा आजचे दर

गुन्हेगारीशी संबंध कसा?

लोकांनी हे गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून जाणून घेणं महत्त्वाचं आहे तर पोलिसांनी अधिक सतर्क राहण्यासाठी हे समजून घेतलं पाहिजे असं कुमार यांनी म्हटलं आहे. “8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत पूर्ण अंधार अशतो. या काळात गुन्हेगार सक्रीय होतात. त्यानंतर 16 ऑगस्टला अमावस्या आहे. .यावेळी चंद्राचा उदय पहाटे 6 वाजता होतो आणि सायंकाळी 6 वाजता तो मावळतो. म्हणजेच 16 ऑगस्टला काळोखी रात्र असते. अशावेळी पूर्ण रात्रभर आरोपी अधिक सक्रीय असतात,” असं कुमार यांनी चंद्राच्या कलांचा गुन्हेगारीशी संबंध जोडताना म्हटलं आहे.

पोस्ट केला व्हिडीओ

24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत चंद्र दिसेल. म्हणजे रात्री 12 ते पहाटे 6 वाजेपर्यंत काळोखी रात्र असते. या काळात गुन्हेगार सक्रीय होतात. म्हणूनच हिंदू पंचांगाचा वापर पोलिसांनी गुन्हेगारांची शैली समजून घेण्यासाठी करावा असा सल्ला कुमार यांनी दिला.

परिपत्रकाचा उद्देश हाच की…

“पंचांगामध्ये कधी अमावस्या आहे. कधी शुक्ल पक्ष आणि कधी कृष्ण पक्ष संपतो हे समजतं. पोलिसांनी या काळात सक्रीय राहणं आवश्यक आहे. जनतेनंही हे समजून घेणं आवश्यक आहे. या परिपत्रकाचा उद्देश हाच आहे की गुन्हेगारी कमी व्हावी. हे जनतेसाठी फार फायद्याचं आहे. प्रत्येकाला गुन्हेगार कधी सक्रीय असतात हे समजायला हवं,” असं कुमार म्हणाले.

हेही वाचा :  VIDEO: नवरदेवाला लग्नात मिळालं 1.25 किलो सोने, मर्सिडीज कार अन् 1 कोटी रुपये रोख; पाहुणे पाहतच बसले



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …