ठाणेकरांना काहीसा जलदिलासा ; भातसा धरणाचा दरवाजा दुरुस्त होईपर्यंत पर्यायी दरवाजातून कालव्यात पाणी सोडले


मात्र तरीही २० दशलक्ष लिटर पाण्याचा कमी पुरवठा

भातसा धरणाच्या दरवाजामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे शहराला ५० टक्के कमी पाणी पुरवठा होत असल्याने आठवडाभरापासून शहरातील घोडबंदर, वर्तकनगर भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ही टंचाई कमी करण्यासाठी जलसंपदा विभागाने भातसा धरणाच्या बिघडलेल्या दरवाजाची दुरुस्ती होईपर्यंत पर्यायी दुसऱ्या दरवाजातून कालव्यात पाणी सोडण्यास सूरुवात केली असून यामुळे ठाणेकरांना ५० टक्केऐवजी केवळ दहा टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. पाणी पुरवठ्यात वाढ झाल्याने ठाणेकरांना काहीसा जलदिलासा मिळाला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतामार्फत दररोज ४८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यापैकी २०० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून करण्यात येतो. त्यासाठी महापालिका भातसा धरणाच्या पिसे बंधाऱ्यातून पाणी उचलते. भातसा धरणाच्या दरवाजामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने ठाणे महापालिकेच्या योजनेतून शहराला ५० टक्के कमी पाणी पुरवठा होत आहे. दररोज दोनशेऐवजी शंभर दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होत असल्यामुळे ठाणेकरांचे गेल्या आठवडाभरापासून हाल सुरु आहेत. शहरातील घोडबंदर, वर्तकनगर भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. घोडबंदर भागातील अनेक उच्चभ्रू संकुलातील रहिवाशी तीन ते चार हजार रुपये खर्च करून पाण्याचे टँकर मागवित आहेत. ऐन उन्हाळ्यात पाण्याविना ठाणेकरांचे हाल सुरु आहेत. ही बाब लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने भातसा धरणाच्या बिघडलेल्या दरवाजाची दुरुस्ती होईपर्यंत पर्यायी दुसऱ्या दरवाजातून कालव्यात पाणी सोडण्यास सूरुवात केली आहे. यामुळे पिसे बंधाऱ्यातून दररोज ९० टक्के म्हणजेच १८० दशलक्षलीटर इतके पाणी उचलणे पालिकेला शक्य होत आहे. दरम्यान, दरवाजा दुरुस्तीचे कामही युद्धपातळीवर सुरु असून ते काम होताच पालिकेला पुर्वीप्रमाणेच २०० दशलक्ष लिटर इतके पाणी उपलब्ध होईल, अशी माहिती महापालिकेचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.

हेही वाचा :  राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त कोणत्या बॅंका बंद? समोर आली अपडेट

विभागवार नियोजन रद्द –

पाणी टंचाईची झळ कमी व्हावी यासाठी महापालिकेने उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे विभागावार नवे नियोजन करून ठाणेकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पिसे बंधाऱ्यातून १८० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होत असल्यामुळे पालिकेने नियोजन रद्द करून पुर्वीप्रमाणेचे पाणी पुरवठा सुरु ठेवण्यास सुरुवात केली आहे, असे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी सांगितले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी, डेस्टिनेशन वेडींगमध्ये ‘असं’ काही झालं की वऱ्हाडाचा उडाला गोंधळ

Destination Wedding: महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी…यांच्या लग्नात उडाला गोंधळ…असंकाही तरी हेडींग वाचून तुम्ही याचा …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …