करण जोहरच्या ‘बेधडक’ चित्रपटाची घोषणा; आणखी एका स्टारकिडला केलं लाँच

Karan Johar announces Bedhadak : बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्मता आणि दिग्दर्शक करण जोहरनं (Karan Johar) त्याच्या ‘बेधडक'(Bedhadak) या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटातून त्यानं तीन नव्या कलाकारांना लाँच केलं आहे. या चित्रपटामधून संजय कपूर (Sanjay Kapoor) आणि महीप कपूर (Maheep Kapoor) यांची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तसेच लक्ष्य लालवानी (Laksh Lalwani) आणि गुरफतेह पीरजादा (Gurfateh Pirzada)  हे दोन अभिनेते देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतानं यानं केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून करण जोहरनं या चित्रपटातील कलाकारांची ओळख प्रेक्षकांना करून दिली आहे. 

करण जोहरचं ट्वीट

करणने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, ‘आम्ही तुमच्या समोर एक खास प्रेम कथा मांडणार आहोत. या चित्रपटात करण ही भूमिका लक्ष साकारणार आहे तर निमृत ही भूमिका शनाया कपूर साकारणार आहे. तसेच अंगद ही भूमिका अभिनेता  गुरफतेह पीरजादा साकारणार आहे. ‘

बेधडक चित्रपटात करण ही भूमिका साकारणारा अभिनेता लक्ष हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. तर शनाया ही अभिनेता संजय कपूरची मुलगी आहे. शनाया आधी करणनं आलिया भट आणि वरूण धवन या स्टार किड्सला लाँच केले होते. आलिया आणि वरूणनं करणच्या 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या स्टूडंट ऑफ द इयर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

हेही वाचा :  अभिनेत्री जमुना यांचे निधन; दाक्षिणात्य अभिनेत्यांकडून शोक व्यक्त

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …