Team India: चेतन शर्माकडे पुन्हा निवड समितीचं अध्यक्षपद, समितीमध्ये कुणा कुणाची वर्णी

Team India Selection Committee: बीसीसीआयच्या (BCCI) राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदी  (Team India Selection Committee) चेतन शर्मा (Chetan Sharma)  यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीत शिवसुंदर दास, सुब्रातो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन शरथ यांचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीत काम करण्यासाठी जवळपास 600 खेळाडूंनी आपला अर्ज दाखल केला होता. बीसीसीआयच्या तीनसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीकडून अकराजणांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली आणि त्यातून पाच जणांच्या निवड समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 विश्वचषकानंतर बीसीसीआयनं चेतन शर्माच्या यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीला बरखास्त केलं होतं. पण आता पुन्हा एकदा चेतन शर्मा यांना संधी दिली आहे. 

बीसीसीआयकडे आले होते 600 अर्ज –
सुलक्षणा नाइक, अशोक मल्होत्रा आणि जतिन परांजपे यांच्या सल्लागार समितीने (CAC) ने अध्यक्ष म्हणून  चेतन शर्मा आणि इतर निवड समितीच्या सदस्यांची निवड केलीय  निवड समितीमधील पाच सदस्यांसाठी बीसीसीआयकडे सहाशे अर्ज आले होते. बीसीसीआयकडे 18 नोव्हेंबरपर्यंत निवड समितीच्या सदस्यांसाठी अर्ज करण्यात आले होते. सल्लागार समितीनं विचारपूर्वक मुलाखतीसाठी 11 जणांची निवड केली होती.   त्यानंतर चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीत शिवसुंदर दास, सुब्रातो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन शरथ यांचा समावेश करण्यात आला. 
 
2022 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 विश्वचषकात भारतीय संघाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीला बरखास्त करण्यात आलं होतं. पण बीसीसीआयनं पुन्हा एकदा चेतन शर्मा यांना संधी दिली आहे.  

हेही वाचा :  फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 80+ ची सरासरी, तरी सरफराजला टीम इंडियामध्ये संधी नाही

हे देखील वाचा-



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …