धावत्या ट्रेनमधून तरूणीला फेकले; मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार

Mumbai Dadar Railway Station : दादर हे मुंबईतील सर्वात गजबजलेले रेल्वे स्टेशन आहे. याच  दादर रेल्वेस्थानकात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. दादर रेल्वे स्टेशनवर एका तरुणीला धावत्या  ट्रेनमधून फेकले आहे.  सुदैवाने तरूणी थोडक्यात बचावली आहे. या घटेमुळे एकच खळबळ उडाली असून रेल्वे प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

पुण्याहून मुंबईकडे येणा-या उद्यान एक्सप्रेसमधलील लेडीज डब्यातून ही तरुणी प्रवास करत होती. याच  घटना लेडीज डब्यातून या तरुणीला धावत्या ट्रेनच्या बाहेर फेकण्यात आल्याचे समजते. पीडीत तरुणीचे वय 29 वर्षे आहे. या तरूणीवर हल्लेखोरांनी हल्ला केला होता. या हल्लेखोरांना प्रतिकार केल्याने धावत्या ट्रेनमधून तरुणीला बाहेर फेकून दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

6 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. मात्र, हा प्रकार आज उघडकीस आला आहे. दादर स्टेशनच्या प्लॅटफॅार्मवर उद्यान एक्सप्रेस आल्यानंतर जनरल लेडीज डब्यातील सर्व महिला उतरल्यानंतर संबंधित तरूणी एकटीच डब्यात असल्याचे पाहून हल्लेखोर डब्यात चढला. यावेळी तरूणीने त्याला प्रतिकार केला. झटापटीत हल्लेखोराने चालत्या ट्रेनमधून फेकून दिले. सुदैवाने ती प्लॅटफॅार्मवर पडल्याने पडली आणि जखमी होवून बेशुद्ध पडली. पोलिसांनी हल्लेखोराला सीएसटीवरून अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे रेल्वेतून प्रवास करणा-या महिलांच्या सुरक्षततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

हेही वाचा :  Delhi Murder: स्नेहा, निक्की, श्रद्धा, निकिता आणि आता... कधी बदलणार ही मानसिकता?

मुंबईत रेल्वे प्रवास महिलांसाठी असुरक्षित 

मुंबईत रेल्वे प्रवास महिलांसाठी असुरक्षित असल्याचे दिसत आहे.  हार्बर मार्गावर चालत्या लोकलमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती.  पश्चिम रेल्वेवरील देखील तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली होती. मालाड इथं राहणारी तरुणी कामानिमित्त चर्नी रोड इथं जात होती. मात्र ग्रँट रोड स्थानक आल्यानंतर एका तरुणाने तिच्यासोबत छेडछाड केली. हा मुलगा अश्लील हावभाव करत त्रास देत होता. या तरुणीनं आरडाओरडा केल्यानंतर त्यानं पळ काढला. मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसात या तरुणीनं तक्रार दाखल केलीय.  या घटनेमुळे लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालाय. दरम्यान भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पश्चिम रेल्वेच्या अधिका-यांची भेट घेऊन महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला होता. 
 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …