Lesbian Love Story: ऐकावं ते नवलचं, दोन मुलांची आई तरी झाली पुन्हा लग्नाची घाई

Lesbian Love Story: उद्या व्हॅलेंटाईन डे आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याची लव्ह स्टोरी ही आठवतेच. कशा प्रकारे आपली लव्ह स्टोरी सुरु झाली आणि आज आपण आपल्या साथीदारासोबत किती सुंदर आयुष्य काढतोय या सगळ्या गोष्टी आठवून आनंदी होतो. मात्र, या सगळ्यात एक नवी आणि युनिक लव्ह स्टोरी अविवाहित समोर आली आहे. एक विवाहित स्त्री एका अविवाहित स्त्रीच्या प्रेमात इतकी पडली की तिनं तिच्यासोबत जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली. इतकंच काय तर मी तिच्यासोबतच राहीन यावर ती ठाम होती. त्या मुलीचेही विविहीत स्त्रीवर इतके प्रेम होते की ती देखील लग्नावर ठाम होती. (Unique Love Story) 

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या विवाहित महिलेला दोन मुलं आहेत. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे प्रकरण नक्की कुठलं आहे. तर हे धक्कादायक प्रकरण मध्य प्रदेशातील हरदा येथील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसही या प्रकरणात काहीही करू शकत नाहीत, कारण दोघेही बालिक आहेत. अन्नू खान नावाच्या मुलीची जीवनशैली आणि तिचे कपडे घालण्याची पद्धत अगदी मुलांसारखी आहे, असे सांगितले जात आहे. दुसरी समोर आलेली बातमी अशी आहे की विवाहित महिला आणि अन्नू दोघेही एकाच घरात भाडेकरू होते.

हेही वाचा :  आधी पत्नीला संपवले मग न्याय मागायला गेला; 17 वर्षांनंतर स्वतःच्याच जाळ्यात असा अडकला

मिळालेल्या माहितीनुसार, विवाहित महिलेला पती आणि दोन मुलं आहेत. हरदा सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अन्नू आणि विवाहित नगमा दोघेही लग्न करण्यावर ठाम आहेत. दोघांच्या कुटुंबीयांचा यावर विरोध आहे, पण हे जोडपे एकमेकांपासून वेगळे न राहण्याच्या त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. 

हेही वाचा : आधी Miscarriage आणि मग घटस्फोट ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झालं असं काही की वाचून तुम्हालाही बसेल धक्का

5 फेब्रुवारी रोजी दोघेही घरातून पळून गेले होते. यानंतर मुख्यमंत्र्यांचे हरदा येथील कृषी उपज मंडई येथे ‘सामूहिक विवाह कार्यक्रमात’ सहभागी होण्यासाठी तेथे पोहोचले होते. दरम्यान, कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात त्या दोघी हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी दोघांचे कॉल डिटेल्स तपासण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्नूने रविवारी तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधताच पोलिसांना तिच्या ठिकाणाची माहिती मिळाली. दोघेही इटारसी येथे होते. यानंतर पोलिसांनी दोघांनाही घटनास्थळावरून ताब्यात घेतले. मात्र, आता दोघेही एकमेकांसोबत राहण्यावर ठाम आहेत.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

व्यवस्थित Zoom करून पाहा; अवकाशातून असा दिसतो ‘राम सेतू’… समोर आला पहिला स्पष्ट फोटो अन् नवी माहिती

Ram Setu high resolution photo : राम सेतू… भारतीयांसाठी कमालीचा जिव्हाळ्याचा विषय आणि संशोधकांसाठी संशोधनाचा …

PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही? हायकोर्टाचा सवाल; म्हणाले, ‘चालण्याची जागा मूलभूत अधिकार’

Bombay High Court On Footpaths Streets: मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एका प्रकरणासंदर्भात भाष्य करताना पंतप्रधान आणि …