Tag Archives: zee 24 taas

पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, सरकारची नवी योजना जाणून घ्या

Pension Scheme: देशभरातील पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पेन्शनधारकांना सरकार अनोखे गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. आता PFRDA कडून सर्व बँक शाखांमध्ये NPS सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आखली जात आहे. यामुळे प्रत्येक पेन्शनधारकाला त्याच्या पेन्शनचा लाभ सहज मिळू शकेल. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) चे अध्यक्ष दीपक मोहंती यांनी याबद्दल माहिती दिली. नक्की कशी असेल ही …

Read More »

भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेच नाही, चीनच्या सर्वोच्च शास्त्रज्ञाचा खळबळजनक दावा

Indias Chandrayaan-3: भारताच्या चंद्र मोहीम चांद्रयान-3 चे जगभरातून कौतुक होत आहे. चांद्रयानच्या यशस्वी मोहिमेनंतर विविध देशाच्या प्रमुखांनी इस्रोचे कौतुक केले. असे असताना आपले शेजारील राष्ट्र चीनच्या मनात काहीतरी वेगळेच चालले आहे. भारताचे चांद्रयान 3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर किंवा त्याच्या आसपास उतरले नाही असा दावा चीनी वरिष्ठ शास्त्रज्ञाने केला आहे.आतापर्यंत भारताच्या यशावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही वा वाद घातला …

Read More »

गणेश विसर्जनावेळी झारखंडच्या टोळीपासून सावधान! 16 लाखांचे तब्बल 52 मोबाईल जप्त

Ganesh Visarjan: मुंबई, पुणे शहरामध्ये गणेश विसर्जनाची तयारी सुरु आहे. एका दिवसावर विसर्जन आले आहे. तुम्हीपण बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करत असाल तर स्वत:चे खिसे संभाळून. कारण गणेशोत्सव काळात झारखंडची टोळी सक्रीय झाली आहे. ही टोळी भाविकांचे खिसे कापून मोबाईल लंपास करणाऱ्यांची टोळी सक्रीय झाली आहे. हडपसर पोलिसांनी या चोरांच्या टोळीला अटक केली असून त्यांच्याकडून 16 लाखांचे तब्बल 52 मोबाईल जप्त …

Read More »

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी ‘रिंग रोड’ तयार, कसा असेल? जाणून घ्या

Pune Ganseh Visarjan: पुण्यात होणाऱ्या गणेश विसर्जन मुरवणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. अनेक मानाचे गणपती, ढोल ताशांचा गजर, वादन, लेझर शो असा भव्य मिरवणूक सोहळा पाहायला मिळतो. पुण्याच्या रस्त्यांवर लाखो नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. याचा वाहतुकीला अडथळा येत असल्याने साहजिकच पोलिसांवर ताण येतो. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मिरवणूक लवकरात लवकर संपवण्याची सूचना सर्व मंडळांना …

Read More »

डिओड्रंटचा इतका मोठा स्फोट की शेजारच्या घरातील काचा फुटल्या, नाशकातील धक्कादायक घटना

Nashik Explosion of Deodorant: तुम्ही डिओड्रंट वापरता? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण आपण वापरत असलेला डिओड्रंट हा एखाद्या बॉम्बप्रमाणे काम करतो. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे.नाशिक शहरातील सिडको परिसरात उत्तमनगर येथे सकाळी सहा वाजेच्या सुमारास एका घरात डिओडरंटचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की यामुळे शेजारच्यांच्या घरातील काचा फुटल्या. एवढंच नव्हे …

Read More »

फ्लिपकार्टची सर्वात मोठी ऑफर, आयफोनपासून लॅपटॉप सर्वकाही कमी किंमतीत

Flipkart Big Billion Days 2023: सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. अनेक कंपन्या मोठ मोठ्या ऑफर्स देऊन ग्राहकांना आकर्षित करत आहेत. यात आता फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 2023 सज्ज झाला आहे. या सेलमध्ये सर्व ब्रँडच्या उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. तसेच बँक कार्ड वापरल्यास किंवा ईएमआयमध्ये पैसे भरल्यास तुम्हाला मोठ्या सवलती मिळू शकतात. आयफोनपासून लॅपटॉपपर्यंत सर्व वस्तू येथे …

Read More »

पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात मोठी त्रुटी, इसम अचानक समोर आला आणि…पाहा व्हिडीओ

PM Modis security major lapse: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा ताफ्यात मोठी चूक समोर आली आहे. पंतप्रधान मोदी शनिवारी संध्याकाळी सिग्रा येथील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथून विमानतळाकडे निघाले असताना एका तरुणाने त्यांच्या ताफ्यासमोर उडी मारली. पंतप्रधानांच्या गाडीला नेहमीप्रमाणे सुरक्षा रक्षकांचा गराडा होता. धक्कादायक म्हणजे असे असतानादेखील हा तरुण पीएम मोदींच्या गाडीपासून अवघ्या 10 फूट अंतरावर पोहोचला होता. पंतप्रधान मोदींच्या संसदीय …

Read More »

रविवारच्या सुट्टीत घराबाहेर पडताय? हवामान विभागाची पावसाबद्दल महत्वाची अपडेट

Heavy Rain in Maharashtra: रविवारची सुट्टी आणि गणेशोत्सव सुरु असताना आज सर्वजण घराबाहेर पडतील. पण घराबाहेर पडण्याआधी हवामान विभागाने दिलेली महत्वाची अपडेट जाणून घ्या. हवामान विभागाने  यलो अलर्ट जाहीर केला आहे. असे असले तरी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात पावसाचा जोर तुलनेत कमी राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भ (यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, …

Read More »

रेल्वेचे देवदर्शन करु इच्छिणाऱ्यांना खास गिफ्ट, 7 ज्योतिर्लिंग यात्रा फक्त ‘इतक्या’ रुपयात

IRCTC Tour Package: तुम्हाला देवाधर्माची आवड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी नेहमीच काहीतरी स्पेशल गिफ्ट घेऊन येत असते. रेल्वेकडून अनेक टूर पॅकेजेस सुरू करण्यात येत आहेत. यावेळी तुम्हीही धार्मिक सहलीची योजना आखत असाल किंवा ज्योतिर्लिंगाला भेट देण्याचा विचार करत असाल तर रेल्वेने तुमच्यासाठी खास पॅकेज आणले आहे. विशेष म्हणजे हे पॅकेज सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे …

Read More »

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मुकेश अंबानींची मोठी घोषणा, मोबाईलनंतर आता इंटरनेट जगात क्रांतिकारी पाऊल

Jio AirFiber launched: आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर विविध टेक,ऑटो क्षेत्रातील कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स आणत आहेत. यात अंबनींची जिओदेखील मागे नाही. मोबाईल क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केल्यानंतर आता मुकेश अंबानी यांनी देशातील 8 मेट्रो शहरांमध्ये Jio AirFiber लाँच केले आहे. जिओ एअर फायबर होम एंटरटेनमेंट, स्मार्ट होम सर्व्हिस आणि हाय-स्पीड ब्रॉडबँड यांसारख्या सेवा प्रदान करेल. कंपनीने दिल्ली, मुंबई, हैदराबाद, …

Read More »

गणेश चतुर्थीला यामाहाची बाईक फक्त 8 हजारात आणा घरी

Yamaha bike Offer: महाराष्ट्रासह देशभरात सकाळपासून गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळत आहे.या शुभ मुहूर्तावर नवीन बाईक किंवा स्कूटर खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी, तुम्ही केवळ सवलतींद्वारेच नव्हे तर कमी डाउन पेमेंट आणि व्याजदरांद्वारे देखील बचत करू शकणार आहात. तुम्ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आणि बाप्पाचे स्वागत करण्यासाठी, …

Read More »

वाघिणीच्या बछड्याचे ‘आदित्य’ नाव ठेणवण्यास मुनगंटीवारांचा विरोध; दानवे म्हणाले, ‘तरीही आदित्य जास्त तळपत राहील’

Tigress calf Name Politics: राज्याचे राजकारण प्रचंड वेगाने बदलत असल्याचे आपण पाहत आहोत. त्यामुळे राजकारणा कोणत्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. असाच एक प्रकार संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाला. वाघिणीच्या बछड्याचे नाव आदित्य ठेवण्यावरुन राज्याचे राजकारण तापलेले दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील वाघिणीने पिल्लांना जन्म दिल्यानंतर राजकारण सुरु झाले आहे. वाघिणीच्या पिल्लांचा नामकरण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी बछड्यांच्या नावासाठी …

Read More »

तुमच्यावर ही वेळ आणणाऱ्या ‘सजा’कारांना शिक्षा द्या- राज ठाकरे

Marathwada Muktisangram: तुम्ही रझाकारांना धडा शिकवलात, आता तुमच्यावर ही वेळ ज्यांनी आणि आणली त्या ‘सजा’कारांना शिक्षा द्या, असे आवाहन  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त त्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. दिवसेंदिवस संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा; कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता, असे ते म्हणाले.  फक्त …

Read More »

तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? RBIच्या ‘या’ नियमामुळे वाचू शकतात लाखो रुपये

RBI Home Loan Rule: घर खरेदीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक गृहकर्जाची मदत घेतात. गेल्या वर्षी व्याजदरात सातत्याने वाढ झाल्याने बहुतांश गृहकर्जांचा कालावधी वाढला आहे. काही कर्जदारांच्या कर्जाची रक्कम इतकी मोठी असते की त्यांना त्यांच्या निवृत्तीपर्यंत कर्जाची परतफेड करावी लागते. व्याजदर वाढतात कर्जदारांचा वाढता समान मासिक हप्ता (EMIs) कमी व्हावा यासाठी बॅंकांकडून कर्जाचा कालावधी वाढवला जातो. जास्त व्याजामुळे कर्जदारांना त्रास दिला …

Read More »

अरे वा! ‘येथे’ सापडली ‘पांढऱ्या सोन्याची खाण’, संपूर्ण देशाचे नशीब बदलणार फक्त एकाच गोष्टीची भीती….

Lithium treasure trove usa: जगातल्या प्रत्येक देशात कुठे ना कुठे खनिजांचा साठा आढळत असतो. उत्खनन करताना अशा गोष्टी सापडतात, ज्यांचा कधी विचारही केलेला नसतो. आणि त्याचे बाजारमूल्य हे किंमतीत मोजणेही कठीण असते. अनेक देशांत अशा घटना समोर येतात, अशाच एका घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊया. अमेरिकेतील एका प्राचीन ज्वालामुखीमध्ये लिथियमचा खूप मोठा साठा आढळल्याचे वृत्त समोर येत आहे. याला ‘पांढरे सोने’ …

Read More »

लग्नावर 200 कोटी खर्च! 417 कोटींची मालमत्ता जप्त, सौरभ चंद्राकर आहे तरी कोण?

Who Is Saurabh Chandrakar:देशात अनेक  घोटाळे समोर येत असतात. त्यात घोटाळेबाजांनी कोट्यावधींची उड्डाणे घेतलेली असतात. छत्तीसगडमध्ये निवडणुकीपूर्वी सट्टेबाजीचे रॅकेट समोर आले आहे.  ‘महादेव बुक’ अ‍ॅप या नावाने लाखो करोडो रुपयांची सट्टेबाजी चालायची असे ईडीच्या निदर्शनास आले आहे.  या संदर्भात आतापर्यंत सौरभ चंद्राकरची 417 कोटी रुपयांची अवैध मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून आता सौरभ चंद्राकरची चौकशी सुरु आहे. सौरभ चंद्राकर …

Read More »

भारताचे असेही एक इंजिनीअर, जे तिसरीपर्यंत शिकले पण आज लाखो अभियंत्यांसाठी बनलेयत प्रेरणा

National Engineers Day: इंग्रजांनी बांधलेले ब्रीज, रस्ते आजही शाबूत आहेत पण काही वर्षांपूर्वीचे बांधकाम लगेच कोसळते हे आपण पाहत आलो असू. या सर्वाला जबाबदार असतो तो इंजिनीअर. इंजिनीअर म्हणजे अशी व्यक्ती जी विज्ञानाची सिद्धांत लागू करून समस्या सोडवू शकते. देशातील लाखो मुले दरवर्षी अभियांत्रिकीच्या पदव्या घेतात, पण प्रत्यक्षात ते खरंच इंजिनीअर आहेत का? या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. पण एम …

Read More »

RBI Job: भारतीय रिझर्व्ह बँकेत पदवीधरांना नोकरी, 52 हजारपर्यंत मिळेल पगार

RBI Recruitment: बॅंक भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)मध्ये बंपर भरती सुरु असून पदवीधरांना चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. आरबीआयमध्ये असिस्टंट (सहाय्यक) च्या एकूण 450 रिक्त जागा भरण्यात येणार …

Read More »

भारतातील सर्वाधिक शिकलेला मराठी नेता, 42 विद्यापीठातून शिक्षण, डॉक्टर, वकील, IAS, IPS आणि बरंच काही

Srikant Jichkar: एखादा माणूस आपल्या आयुष्यात किती पदव्या घेऊ शकतो? किती विद्यापिठात शिकू शकतो? यावर आपलं उत्तर 1 ते 10 आकड्यापर्यंत असू शकते. पण असा मराठी माणूस आहे, जो भारतातील सर्वात शिक्षित माणूस म्हणून ओळखला जातो. या मराठी माणसाकडे तब्बल 20 डिग्री आहेत. एकूण 42 विद्यापीठांमधून त्यांनी हे शिक्षण घेतले आहे. श्रीकांत जिचकर हे मराठी नेते अधिकृतपणे भारतातील सर्वात शिकलेले …

Read More »

बियाणे कंपनीमुळे शेतकरी रडकुंडीला, 60 दिवस आधीच पिकली शेती; अन्नाचा दाणाही मिळणे कठीण

प्रवीण तांडेलकर, झी मीडिया, भंडारा : बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट होण्याचे प्रकार सर्व जिल्ह्यात वाढू लागले आहेत. यावर राज्य सरकारने कडक कायदे आणूनही बियाणे कंपन्यांची मुजोरी कमी होताना दिसत नाही. यामुळे शेतकरी राजाला रडकुंडीला येण्याची वेळ येते.  भंडारा जिल्ह्यातील जांभोरा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये बोगस बियाणामुळे शेतकऱ्याच्या वर्षभराच्या मेहनतीचे पाणी झाले आहे. काय आहे ही घटना? …

Read More »