तब्बल १८ लाखांचा इनाम असलेल्या नक्षली जोडप्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण | Naxal couple carrying reward of Rs 18 lakh surrenders in Gadchiroli msr 87


आतापर्यंत एकूण ६४९ कट्टर नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे

गडचिरोली पोलिसांसमोर आज तब्बल १८ लाख रुपयांचा इनाम असलेल्या नक्षली जोडप्याने पोलिसांसमोर आज आत्मसमर्पण केलं. गडचिरोलीतील एटापल्ली तहसीलमधील गदेरी येथील रहिवासी दीपक उर्फ मुन्शी रामसू इष्टम (३४) आणि त्याची पत्नी शमबत्ती नेवारू आलम (२५, मूळ छत्तीसगडमधील हिदवाडा) यांनी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासमोर आत्मसमर्पण केले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. या जोडप्याच्या डोक्यावर १८ लाख रुपयांचा इनाम होता.

दिपक हा विभागीय समिती सदस्य आणि प्लाटून क्रमांक २१ चा कमांडर म्हणून काम करत होता, तर शामबत्ती ही त्याच्या प्लाटूनची सदस्य होती, असे अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपकचा तीन खून, आठ चकमकी आणि दोन जाळपोळीत सहभाग होता. छत्तीसगडच्या विविध भागांत त्याने सहा हल्लेही केले होते, ज्यात ३१ पोलीस कर्मचारी मारले गेले होते. त्याचप्रमाणे सुरक्षा दलांसोबत झालेल्या दोन चकमकीत शामबत्तीचा देखील सहभाग होता, असेही नमूद करण्यात आले आहे.

दीपकला सहा लाख रुपये, तर त्याच्या पत्नीला अडीच लाख रुपये मिळतील आणि त्याशिवाय पुनर्वसनासाठी जोडप्याला दीड लाख रुपयांची अतिरिक्त मदत दिली जाईल, अशी माहिती देखील देण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत एकूण ६४९ कट्टर नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

हेही वाचा :  Success Story: बॅंकेची नोकरी सोडून छोट्याशा दुकानातून आईसोबत इडली विकायला सुरुवात, आता दिवसाला..

पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी आत्मसमर्पण करण्यास आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election 2024 : मतदान करा अन् बिअर, कॅब राईड मोफत मिळवा; कधीपर्यंत वॅलिड आहेत या ऑफर?

Loksabha Election 2024 : देशभरामध्ये लोकशाहीचा उत्सव अर्थात निवडणुकीच्या पर्वाला सुरुवात झाली असून देशातील सरकार …

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …