Sunil Shende Passed Away : अभिनेते सुनील शेंडे काळाच्या पडद्याआड

Sunil Shende Passed Away : मराठी-हिंदी मनोरंजनक्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे (Sunil Shende) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ‘सरफरोश’, ‘गांधी’, ‘वास्तव’ अशा अनेक सिनेमांत ते महत्त्वाच्या भूमिकेत होते. त्यांच्या या भूमिका प्रेक्षकांमध्ये चांगल्याच लोकप्रिय झाल्या होत्या. 

सुनील शेंडे राहत्या घरी चक्कर येऊन पडले. त्यानंतर त्यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. विलेपार्ले येथील राहत्या घरीच रात्री एक वाजता त्यांचे निधन झाले आहे. आज सुनील शेंडे यांच्या पार्थिवावर पारशीवाडा याठिकाणी असणाऱ्या स्मशानभूमित अंत्यसंस्कार केले जातील.

सुनील शेंडे यांनी अनेक हिंदी-मराठी सिनेमांत वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळेच त्यांना हरहुन्नरी अभिनेता म्हटले जाते. रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि भारदस्त आवाजामुळे त्यांना पोलीस, राजकारणी अशा भूमिका जास्त मिळाल्या आहेत. 

नव्वदच्या दशकात सुनील शेंडे खूप लोकप्रिय होते. ‘निवडुंग’, ‘मधुचंद्राची रात्र’, ‘जसा बाप तशी पोर’, ‘ईश्वर’, ‘नरसिम्हा’ अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत सुनील शेंडे यांनी काम केलं आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही वेगळी छाप सोडली होती. पण गेल्या काही दिवसांपासून ते मनोरंजनसृष्टीपासून दूर होते. 

हेही वाचा :  Amitabh Bachchan : आजही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केला जातोय : अमिताभ बच्चन

Reels

सुनील शेंडे यांच्या पश्चात त्यांची पत्नी ज्योती सुनील शेंडे, दोन मुलं ऋषिकेश शेंडे आणि ओमकार शेंडे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. सुनील शेंडे यांनी सिनेमांसह अनेक नाटकांत आणि मालिकांमध्येदेखील काम केलं आहे. 

‘गांधी’ फेम सुनील शेंडे!

‘गांधी’ या सिनेमाच्या माध्यमातून सुनील शेंडे यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमात ते डाकूच्या भूमिकेत दिसले होते. ‘पहला प्यार’ या गाजलेल्या मालिकेचादेखील सुनील शेंडे भाग होते. मराठी रंगभूमीवर त्यांनी अनेक नाटकांत काम केलं आहे. अष्टपैलू अभिनेते म्हणून ते ओळखले जायचे. 

संबंधित बातम्या

Siddhaanth Vir Surryavanshi: सिद्धांत वीर सूर्यवंशीच्या पत्नीनं शेअर केली भावनिक पोस्ट; म्हणाली, ‘जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत ..’

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …