उपजिल्हाधिकाऱ्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा; सहाय्यक आयुक्तांचे मृत्युप्रकरण | Crime against seven persons including Deputy Collector Death case Assistant Commissioner akp 94


तणावात पती शदरकुमार प्रचंड मानसिक दबावात आला.

यवतमाळ : कौटुंबिक वादातून मानसिक ताण आल्याने एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याचा ऑगस्ट २०२० मध्ये येथे मृत्यू झाला होता. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर उपजिल्हाधिकारी स्नेहा चंद्रशेखर उबाळे उर्फ स्नेहा शरदकुमार खंडाळीकर (३७), यवतमाळ यांच्यासह  सात जणांविरुद्ध मानसिक व शारीरिक त्रास देऊन  मृत्यूस प्रवृत्त केल्याबद्दल आज येथील लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

विक्रीकर सहाय्यक आयुक्त शरकुमार सुधाकर खंडाळीकर (३२) रा. राज नगर नांदेड यांचा २५ ऑगस्ट २०२० रोजी मृत्यू झाला. त्यानंतर मृताचा भाऊ सुरेंद्र सुधाकर खंडाळीकर (२५), रा. नांदेड यांनी या मृत्यूबाबत संशय व्यक्त करून तक्रर दाखल केली. या तक्ररीची दखल घेतली गेली नाही. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनीही तक्ररअर्ज फेटाळला. जिल्हा व सत्र न्यायालयाने मात्र या अर्जाची दखल घेऊन गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार लोहारा पोलिसांनी आज मृताची पत्नी उपजिल्हाधिकारी स्नेहा चंद्रशेखर उबाळे उर्फ स्नेहा शरदकुमार खंडाळीकर हिच्यासह मुंबई पोलिसांत कार्यरत अभिषेक चंद्रशेखर उबाळे (३०), अशोक खोळंबे (५६), मनीषा अशोक खोळंबे (५४), अक्षय अशोक खोळंबे (३०) सर्व रा. आपटेवाडी शिरसगाव बदलापूर, ता. अंबरनाथ, जि. ठाणे, कपिल सातपुते (३३) आणि अंकिता कपिल सातपुते (३३), दोघेही रा. मुकुंदनगर, उल्हासनगर, ता. कल्याण जि. ठाणे यांच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. 

हेही वाचा :  देवाची कृपा नाही नवऱ्याची कृपा; लोकसंख्या वाढीवरुन अजित पवारांची फटकेबाजी

विक्रीकर सहाय्यक आयुक्त शरकुमार सुधाकर खंडाळीकर यांचा स्नेहा चंद्रशेखर उबाळे यांच्यासोबत विवाह झाला होता. उपजिल्हाधिकारी असलेली पत्नी प्रसूतीनंतर मुलीला घेऊन माहेरी गेली ती परतलीच नाही. या तणावात पती शदरकुमार प्रचंड मानसिक दबावात आला. त्यातच २५ ऑगस्ट २०२० रोजी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताचा भाऊ  सुरेंद्र खंडाळीकर याने लोहारा पोलीस ठाण्यात २९ ऑगस्ट २०२० रोजी भावाचा खून झाल्याची तक्रर दिली. या तक्ररीमध्ये शरदची पत्नी तत्कालीन राळेगाव उपविभागीय अधिकारी यांच्यासह सात जणांविरुद्ध संगनमताने कट रचून भावाचा खून केल्याची तक्रर दिली. मात्र या तक्ररीची लोहारा पोलिसांसह पोलीस अधीक्षक, प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांनीही दखल घेतली नाही. सुरेंद्र खंडाळीकर यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश जी. जी. भन्साली यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली. यावेळी न्यायालयापुढे शरदचा मृत्यू नैसर्गिक नसून तो खून असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी शवचिकित्सा अहवालाचा हवाला देण्यात आला. तसेच मृत शरदच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा असल्याचेही न्यायालयापुढे सांगण्यात आले. अपिलकांचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश जी. जी. भन्साली यांनी या प्रकरणात पोलिसांनी तपास करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश १८ फेब्रुवारी रोजी दिले होते. कौटुंबिक वादातून घडलेल्या या प्रकारात न्यायालयाच्या आदेशानुसार आज पोलिसांनी गुन्हे दाखल केले, अशी माहिती लोहारा पोलीस ठाण्याच्या निरीक्षक दीपमाला भेंडे यांनी दिली.

हेही वाचा :  Maharashtra Politics: संजय राऊत नागपूरात राजकीय बॉम्ब फोडणार, ट्विट केलेला फोटो चर्चेत



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान मंगळवारी पार पडलं. यावेळी देशातील 11 …

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …