राज्य सरकारचा अजब कारभार; कुटुंब नियोजन कीटमध्ये दिलं रबरी लिंग, प्रात्यक्षिकाबद्दल कर्मचाऱ्यांसमोर पेच | Rubber sex toy in family planning kit of maharashtra government- vsk 98


आरोग्य विभागाकडून आशा वर्कर्सना या कीटचं प्रात्यक्षिक दाखवण्यास सांगितलं आहे.

लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यात राज्य शासनाच्या महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाची प्रमुख भूमिका आहे. या विभागाकडून कुटुंब नियोजन उपक्रमही राबविण्यात येत आहेत. यापैकीच एक उपक्रम म्हणजे कुटुंब नियोजन कीटचं वाटप. पण ही योजना चर्चेत आल्याचं कारण म्हणजे या कीटमध्ये एक रबरी लिंग देण्यात आलं आहे.

सरकारच्या या निर्णयावर आशा वर्कर नाराज असून त्यांच्यासमोर एक विचित्र पेच निर्माण झाला आहे. कारण आरोग्य विभागाकडून आशा वर्कर्सना या कीटचं प्रात्यक्षिक दाखवण्यास सांगितलं आहे. मात्र आता या रबरी लिंगामुळे त्यांच्यासमोर समस्या निर्माण झाल्या आहेत. याबद्दल राज्य सरकारकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

या घटनेनंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग करत ट्वीट केलं. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? आशांचे हक्काचे करोना काळात ठरलेले ३५/- रू. रोज करोनाची तिसरी लाट दररोज ओसरली असली तरी ती देण्यात आलेली नाही.’ असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा :  वडिलांच्या हत्येचा बदला, तरुणीने आरोपीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं...पण दुसरीलाच संपवलं



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …