हातात हिरव्या बांगड्या, कपाळावर कुंकू आणि… नवरी सारखा शृगांर करुन तरुणाने दिला जीव; मृतदेह पाहण्यासाठी तोबा गर्दी

Crime News : गेल्या काही काळापासून आत्महत्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय. नोकरी, शिक्षण किंवा अन्य काही गोष्टींमध्ये अपयश आल्यानंतर अनेक जण टोकांचं पाऊल उचलतात. पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये (west bengal Siliguri) एका विद्यार्थ्याने गळफास घेत आपले जीवन संपवले आहे. सुरुवातीला हे प्रकरण फक्त आत्महत्येचे वाटत होतं. पण आत्महत्येवेळी असलेल्या त्याच्या पेहरावामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सिलिगुडी महानगरपालिकेच्या शांतीनगर भागात एका तरुणाचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा विद्यार्थी दहावीला असल्याची माहिती समोर आलीय. आत्महत्या करण्यापूर्वी अल्पवयीन मुलाने साडी, पेटीकोट, बांगडी-टिकली आणि महिलांचे अंतर्वस्त्र घातले होते (Youth dressed in saree). मुलाचा मृतदेह पाहताच सर्वांना धक्का बसला. सोमवारी हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

मुलाचा आवाज ऐकला आणि शेजाऱ्यांनी धाव घेतली

आत्महत्या केलेला मुलगा सिलिगुडीच्या बर्दाकांता विद्यापिठात दहावीत शिकत होता. परीक्षा जवळ आल्याने तो त्याची तयारी करत होतो. मात्र सोमवारी त्याचा मृतदेह शेजाऱ्यांना आढळून आला. शेजाऱ्यांनी सांगितले की, त्यावेळी तो एकटाच राहत होता. त्याने दरवाजा आतून बंद करुन घेतला होता. ओरडण्याचा आवाज येताच शेजाऱ्यांनी घरात धाव घेतली. त्यावेळी मुलाने महिलांचे कपडे घातले होते. तो आमच्यासमोर मोठा झालाय. त्याला कधीही अशा गोष्टींमध्ये आकर्षण नव्हते. तो खूप साधा मुलगा होता, असे शेजाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा :  “वेश्या व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक महिलेमागे एक कथा असते पण…”, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी भावूक

आत्महत्या केलेल्या मुलाला अभ्यासातही कोणतीही अडचण नव्हती, अशी माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिलीय. पण मग त्याने असे पाऊल का उचलले हाच प्रश्न सर्वांना पडलाय.

सिलिगुडीमधील दुसरी घटना

दरम्यान, पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनाही हा सर्व प्रकार पाहून धक्का बसला. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. स्थानिक माध्यमांनुसार याआधीही काही महिन्यांपूर्वी सिलिगुडीमध्येच महिलांचे कपडे घातलेल्या एका तरुणाने आत्महत्या केली होती. विद्यार्थ्याच्या या कृतीनंतर आता विविध चर्चांना उधाण आलं आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Godrej Family Tree : लहानपणी तुमच्याही घरात असेल या कंपनीचे कपाट, आता 14 लाख कोटींची कंपनी

देशातील सर्वात जुन्या कुटुंबांपैकी एक असलेले गोदरेज कुटुंब आज तब्बल 127 वर्षांनंतर विभक्त होणार आहे. …

‘असा कसा डॉक्टर बनणार रे तू?’; छोट्या भावाला डॉक्टर बनवण्यासाठी मोठा भाऊ देत होता परीक्षा

Fraud in NEET 2024: देशभरातील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी नॅशनल एलिजिबीलीटी एन्ट्रन्स टेस्ट घेण्यात येते. …