श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी आणि टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, पाहा संपूर्ण खेळाडूंची यादी

IND vs SL : श्रीलंकाविरोधात होणाऱ्या कसोटी आणि टी20 सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. भारतीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी शनिवारी भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माकडे कसोटी संघाचे कर्णधारपदही सोपवण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले होते. कसोटी संघात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोन अनुभवी खेळाडूंना वगळ्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या या अनुभवी खेळाडूंना वगळण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे. 

विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना श्रीलंकाविरोधातील टी 20 मालिकेत आराम देण्यात आला आहे. तर अष्टपैलू शार्दुल ठाकूरला टी-20 आणि कसोटी मालिकेतून आराम देण्यात आला आहे. टी-20 मध्ये जसप्रित बुमराहला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रविंद्र जाडेजाचं दुखापतीनंतर संघात पुनरागमन झाले आहे. 

श्रीलंकाविरोधातील टी 20 मालिकेसाठी भारतीय संघ – 
रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकिपर), सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन (विकेटकिपर), रविंद्र जाडेजा, यजुवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव आणि आवेश खान

हेही वाचा :  India Test Team : कसोटी संघातून डच्चू मिळाल्यानंतर रिद्धिमान साहाचा संताप

श्रीलंकाविरोधातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ – 
रोहित शर्मा (कर्णधार), मयांक अग्रवाल, प्रियांक पांचाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत (विकेटकिपर), रविंद्र जाडेजा, जयंत यादव,  कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार),मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी आणि टी-20 मालिकेचं वेळापत्रक –









वार दिनांक सामना ठिकाण
गुरुवार 24 फेब्रुवारी पहिला टी20 सामना लखनौ
शनिवार 26 फेब्रुवारी दुसरा टी20 सामना धर्मशाला
रविवार 27 फेब्रुवारी तिसरा टी20 सामना धर्मशाला
शुक्रवार 4 मार्च ते 8 मार्च पहिला कसोटी सामना मोहाली
शनिवार 12 मार्च ते 16 मार्च   दुसरा कसोटी सामना बंगळुरु

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

…और ये लगा सिक्स; प्रॅक्टिस मॅचमध्ये धोनीनं लगावला षटकार; चाहत्यांचा जल्लोष

MS Dhoni: टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार कॅप्टन कूल एमएस धोनी (MS Dhoni) म्हणजे, …

भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील पुण्यात सापडले; पोलिसांच्या शोधमोहिमेस यश

Kedar Jadhav :  टीम इंडियाचा (Indian Cricket Team) अष्टपैलू खेळाडू  केदार जाधव (Kedar Jadhav) याचे …