IND Vs SL Test series: रोहित शर्मा कसोटी संघाचा कर्णधार! अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराला वगळलं

IND Vs SL Test series:  भारत आणि श्रीलंका यांच्यातील आगामी कसोटी मालिकेतून अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) वगळण्यात आलंय. तर, रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाची कमान संभाळणार आहे. तर जसप्रीत बुमराहकडं (Jasprit Bumrah) टी-20 संघाच्या उपकर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आलीय. भारताचे वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी याबाबत माहिती दिलीय. भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला 4 मार्चपासून सुरुवात होणार आहे. 

रविंद्र जाडेजाचं संघात पुनारागमन
विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना श्रीलंकाविरोधातील टी 20 मालिकेत विश्रांती देण्यात आलीय. याशिवाय, अष्टपैलू शार्दुल ठाकूरला टी-20 आणि कसोटी मालिकेतून आराम देण्यात आलाय. तर, रविंद्र जाडेजाचं दुखापतीनंतर संघात पुनरागमन झाले आहे. 

व्हिडिओ-

भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेचं वेळापत्रक
बीसीसीआयने मंगळवार श्रीलंकेच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार 24 फेब्रुवारीपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना लखनौमध्ये तर, पुढचे दोन सामने धर्मशाळा येथे खेळले जाणार आहेत. त्यानंतर तेथून संघ मोहालीला रवाना होतील. जिथे पहिला कसोटी सामना 4 मार्चपासून खेळवला जाईल. तर, दुसरा कसोटी सामना 12 मार्चपासून बेंगळुरूमध्ये खेळवला जाईल. 

श्रीलंकाविरोधातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ 
रोहित शर्मा (कर्णधार), मयांक अग्रवाल, प्रियांक पांचाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत (विकेटकिपर), रविंद्र जाडेजा, जयंत यादव,  कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार),मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

इंग्लंडविरुद्ध पहिला टी-20 खेळण्यासाठी टीम इंडिया उतरणार मैदानात; कधी, कुठे रंगणार सामना?

ENG vs IND, 1st T20I: भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेला (England Vs India) आजपासून …

ENG vs IND 1st T20: रोहित परतला, ऋतुराजला बाहेरचा रस्ता? अशी असू शकते दोन्ही संघाची प्लेईंग 11

England vs India: कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागणारा भारतीय संघ टी 20 मालिकेसाठी सज्ज …