Sri Lanka Food Crisis: श्रीलंकेत सोन्यापेक्षा दूध महागले! ब्रेडच्या पाकिटासाठी मोजावे लागतायेत ‘इतके’ रुपये | Sri Lanka Food Crisis: Milk more expensive than gold in Sri Lanka! You have to pay ‘this much for bread packet


श्रीलंकेच्या नागरिकांना सोने खरेदी करण्यापेक्षा दूध विकत घेणे कठीण झाले आहे.

श्रीलंकेचे अन्न संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तिकडच्या नागरिकांना सोने खरेदी करण्यापेक्षा दूध विकत घेणे कठीण झाले आहे. ५४ वर्षीय शामला लक्ष्मण दुधाचे पॅकेट मिळावे म्हणून राजधानी कोलंबोच्या रस्त्यांवर रात्री उशिरा दुधाच्या शोधात एका दुकानातून दुकानात फिरत होत्या. आपल्या सात जणांच्या कुटुंबाचे पोट भरता यावे म्हणून ती सकाळी लवकर दूध शोधण्यासाठी बाहेर पडते, पण तिला अनेकदा दूध मिळत नाही.

‘द गार्डियन’शी संवाद साधताना त्या म्हणाल्या, “आजकाल कोणत्याही दुकानात दूध मिळणे अशक्य झाले आहे. कोणत्याही दुकानात दिसल तरी ते इतकं महाग असतं की आपण ते विकत घेऊ शकत नाही. दुधाचे दर पूर्वीपेक्षा तिप्पट महाग झाले आहेत, त्यामुळे मी माझ्या कुटुंबासाठी दूध विकत घेऊ शकत नाही.”

चिकन झाले लक्झरी

चिकन हा श्रीलंकेच्या जेवणाचा एक महत्त्वाचा भाग आहे, पण त्याच्या वाढत्या किमतींमुळे तो सर्वसामान्यांच्या ताटातून गायब झाला आहे. चिकनच्या किमती दुपटीने वाढल्या असून आता तो लोकांसाठी चैनीचा पदार्थ बनला आहे. शामला म्हणते, “आपल्याला आवश्यक असलेल्या जवळपास सर्व गोष्टी आपल्या आवाक्याबाहेर आहेत. उद्या मी माझ्या कुटुंबाला काय खायला घालणार याची मला दररोज भीती वाटते.”

हेही वाचा :  Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी पोस्टर्स, मुंबईतून बाहेर पडण्यास मनाई

एन.के सिलोन बेकरी ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष जयवर्धने म्हणाले की, काही शहरी भागात स्वयंपाकाच्या गॅसच्या कमतरतेमुळे ब्रेडच्या किमती सुमारे १५० श्रीलंकन ​​रुपये ($0.75) पर्यंत दुप्पट झाल्या आहेत.जयवर्धने म्हणाले, ‘ही परिस्थिती आणखी आठवडाभर अशीच राहिली तर ९० टक्के बेकरी बंद कराव्या लागतील. अनेक बेकर्सनी कर्ज घेतले आहे, ते ते फेडू शकणार नाहीत. सरकारने ताबडतोब काहीतरी उपाय शोधला पाहिजे.

श्रीलंका सध्या सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशाची परकीय चलनाची गंगाजळी जवळपास रिकामी झाली असून चीनसह अनेक देशांच्या कर्जाखाली श्रीलंका दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. जानेवारीमध्ये श्रीलंकेचा परकीय चलन साठा ७०% ने घसरून डॉलर २.३६ अब्ज झाला आहे. परकीय चलनाच्या कमतरतेमुळे श्रीलंकेला परदेशातून अन्न, औषध आणि इंधन यासह सर्व आवश्यक वस्तू आयात करणे अशक्य आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस’, ‘मध्यरात्रीनंतरही बँक सुरु’; कारमध्ये 500 च्या नोटा

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप झाल्याचा गंभीर …

जशास तसा न्याय! बलात्काराच्या खोट्या आरोपात त्याने जे भोगलं तिच शिक्षा कोर्टाने तरुणीला सुनावली

Woman Jail For false Testimony In Rape Case: उत्तर प्रदेशमधील बरेली येथील कोर्टाने शनिवारी एका प्रकरणात …