सिद्धार्थ आणि कियाराचा विवाह सोहळा संपन्न; राजस्थानमध्ये घेतले सात फेरे

Sidharth Malhotra, Kiara Advani wedding: अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) यांचा विवाह सोहळा पार पडला आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांनी राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेसच्या मंडपात सात फेरे घेतले. सिद्धार्थ आणि कियारा यांचा विवाह सोहळा कुटुंबातील सदस्य आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थित पार पडला. त्यांच्या लग्नसोहळ्याची थिम ‘पिंक अँड व्हाईट’ अशी होती. वर पक्षातील पाहुण्यांनी व्हाईट तर वधू पक्षातील पाहुण्यांनी पिंक कलरचे कपडे परिधान केले होते. रिपोर्टनुसार, लग्नसोहळ्यासाठी कियारानं पिंक कलरचा लेहेंगा परिधान केला होता. तर सिद्धार्थने ऑफ व्हाईट कलरची डिझायनर शेरवानी परिधान केली होती. 

संध्याकाळी 5 वाजता कियारा आणि सिद्धार्थ यांनी एकमेकांना हार घातले आणि 6 वाजता त्यांनी सात फेरे घेतले. त्यानंतर सिद्धार्थ आणि कियारानं लग्नसोहळ्याला उपस्थित असणाऱ्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला. रिपोर्टनुसार, सिद्धार्थ आणि कियारा यांची वेडिंग रिसेप्शन पार्टी रात्री 9 वाजता सुरु होणार आहे. 

लग्नासोहळ्याला या सेलिब्रिटींनी लावली हजेरी

सिद्धार्थ आणि कियारा यांच्या विवाह सोहळ्याला करण जोहर, शाहिद कपूर, मीरा कपूर, जूही चावला, मनीष मल्होत्रा यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. सिद्धार्थ आणि कियारा यांनी मनीष मल्होत्रानं डिझाइन केले आऊटफिट परिधान केले होते. 

Source link

हेही वाचा :  Roadies 18 : 'रोडीज 18'मध्ये मुस्कान जटाना स्पर्धक म्हणून दिसणार

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …