न्यू ईअर पार्टीचं प्लॅनिंग करताय? मग सावधान व्हा! ‘ही’ गोष्ट ठरेल अडचणीची

New Year party celebration : नवीन वर्ष सेलिब्रेशनवर यंदा कोरोनाची टांगती तलवार आहे. राज्यात कोरोनाचे 117 नवे रुग्ण आढळून आलेत.. त्यामुळे कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 369 वर पोहोचलीये. धक्कादायक म्हणजे कोरोनामुळे राज्यात एका रुग्णाचा मृत्यू झालाय. त्यामुळेच आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय. पुढचे 10-15 दिवस आरोग्य यंत्रणेनं आणि नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी केलंय. राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-1’ या नवीन  व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने ‘कोरोना टास्क फोर्स’’ स्थापन करण्यात आलीय. या टास्क फोर्सनं सतर्कतेचा इशारा दिलाय. सुट्टया तसंच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन आणि धार्मिक स्थळावंर गर्दी होते. त्यातून कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट होऊ शकतो अशी भीती वर्तवण्यात येतेय. 

कोरोनापासून वाचवण्यासाठी काय काळजी घ्याल?

घर आणि ऑफिस परिसर स्वच्छ ठेवा. ताप आल्यास घरगुती उपचार न करता तातडीनं डॉक्टरांकडे जा. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा. आवश्यक असेल तर सॅनिटायजर वापरा. खोकताना रूमालाचा वापरा, तसेच लहान मुलं आणिवयोवृद्धांना जपा.

टास्क फोर्सची पुन्हा स्थापना

राज्यात कोरोनाचे 117 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 369 वर पोहोचलीये. धक्कादायक म्हणजे कोरोनामुळे राज्यात एका रुग्णाचा मृत्यू झालाय.  या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना टास्क फोर्स पुन्हा स्थापन करण्यात आला आहे. डॉ. रमण गंगाखेडकर या टास्कफोर्सचे प्रमुख असणार आहेत. कोरोनासाठी लागणारी औषध, रुग्णालय, ऑक्सिजन व्यवस्था या सगळ्यांचा टास्क फोर्स आढावा घेणार आहे. रुग्णांवर उपचार करताना समान औषधांचा प्रोटोकॉलही टास्क फोर्स निश्चित करणार आहे. 

हेही वाचा :  पंतप्रधान शिवीगाळ प्रकरणी हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

दरम्यान, कोरोनाचा ‘जेएन-1’ हा नवीन  उपप्रकार घातक नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोविड नियमांचं पालन करावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.. त्यामुळे घाबरु नका, मात्र काळजी घ्या.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …