श्रावण पाळणारा सिंह? झाडाची पानं खाणाऱ्या सिंहाचा Video चर्चेत; खरं कारणही आलं समोर

Lion Munches On Leaves Rare Viral Video: श्रावणामध्ये अनेकजण मांसाहार करत नाहीत. मागील सोमवारपासून अधिक मासाचा श्रावण सुरु झाल्याने अनेकांनी मांसाहार बंद केला आहे. मात्र माणसांबरोबर प्राण्यांनीही श्रावणामध्ये मांसाहार बंद केला आहे की काय असा प्रश्न लोकांना पडावा असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र व्हायरल झालेल्या या व्हिडीमधील सिंहाने शाकाहारी होण्यामागील खरं कारण श्रावण नसून वेगळच आहे.

अनेकांना पडला प्रश्न

सिंह हा जंगलाचा राजा असल्याचं म्हटलं जातं. जंगलातील अनेक प्राण्यांची सहज शिकार करण्याचं कौशल्य असलेल्या सिंहाचा जंगलात चांगलाच दबदाब असतो. शिकार करणे आणि ती फस्त करतानाचे सिंहाचे अनेक व्हिडीओ तुम्हीही सोशल मीडियावर, चॅनेल्सवर पाहिले असतील. मात्र सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आपण आतापर्यंत जे सिंहाबद्दल ऐकलं, पाहिलं आहे ते खरं आहे की खोटं असा प्रश्न पडला आहे. 

हेही वाचा :  Parliament Session: 'रडण्यासाठी फार वेळ असतो, तुम्ही सध्या...', नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला

कोणी शेअर केला आहे हा व्हिडीओ आणि खरं कारण काय?

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ ट्वीटरवर भारतीय वन खात्याचे अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक सिंहीण चक्क गवत खाताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हिडीओमधील सिंहीण झाडाच्या फांद्या पकडून पंजाने आणि तोंडाने त्यावरील पान खात आहेत. सामान्यपणे सिंह असं करताना दिसत नाही. अशाप्रकारे सिंहासारख्या मांसाहार हाच मुख्य आहाराचा भाग असलेल्या प्राण्यांकडून पानं खाण्याचा प्रकार पहायला मिळत नाही.  मात्र सिंहाने मांसाहार सोडून अचानक झाडाची पानं खाण्यामागील खास करणाबद्दलही सुशांत यांनी ट्वीटमध्ये माहिती दिली आहे.

कधीतरी शाकाहार करतो सिंह

सुशांत नंदा यांनी कधीतरी सिंह शाकाहारी गोष्टी खाणं पसंत करतो. सामान्यपणे जेव्हा सिंहाच्या पोटात दुखत असेल किंवा पाण्याच्या पचनासंदर्भातील समस्या सिंहाला जाणवत असतील तर तो पचनसंस्था सामान्य होण्यासाठी झाडाची पानं खातो. या व्हिडीओला हजारोंच्या संख्येनं व्ह्यूज मिळाले आहेत. अशाप्रकारचा दुर्मिळ प्रसंग कॅमेरात कैद झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

हेही वाचा :  नव्याकोऱ्या थारमधून बीटेक पाणीपुरीवाली खेचतेय स्टॉल; व्हिडीओ पाहून आनंद्र महिंद्रा म्हणतात, 'आमच्या गाड्या...'

काही जणांनी जोडलं श्रावण कनेक्शन

अनेकांनी हा व्हिडीओ पाहून हा सिंह सुद्धा श्रावण पाळतोय की काय असा मजेशीर प्रश्न सुशांत नंदा यांच्या ट्वीटला रिप्लाय करुन विचारला आहे. तुम्हीच पाहा काही निवडक कमेंट्स…

अनेकांना आठवली मांजर

तसेच सिंह गवत खातानाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी पाळीव मांजरीही अशाप्रकारे गवत खातात असं म्हटलं आहे. केवळ सिंहच नाही तर मार्जार प्रजातीमधील अनेक प्राणी अशाप्रकारे पानं खातात. अनेकदा तुम्ही मांजरासंदर्भात असा गवत खाण्याचा प्रकार ऐकला असेल. मात्र मोठ्या प्रमाणात अशा मांसाहार करणाऱ्या प्राण्यांनी शाकाहार केला तर त्यांच्या पोटाला पुन्हा त्रास होऊ शकतो. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘…तर लोकांचा विश्वास उडून जाईल,’ सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी सुनावलं, ‘कसं काय तोंड द्यायचं?’

राज्य शालेय सेवा आयोगाच्या सुमारे 25 हजार नियुक्त्या रद्द करण्याच्या कोलकत्ता हायकोर्टाच्या आदेशाविरोधातील याचिकेववरील सुनावणीदरम्यान …

‘कालपर्यंत मलाही ठाऊक नव्हतं की…’; BJP प्रवेशानंतर शेखर सुमनची पहिली प्रतिक्रिया

Shekhar Suman Joins BJP: लोकसभा निवडणुकीचं तिसऱ्या टप्प्याचं मतदान सुरु असतानाच भारतीय जनता पार्टीची ताकद अधिक …