श्रद्धा वाळकरपेक्षाही भयानक प्रकार, पत्नीच्या मृतदेहाचे केले 200 तुकडे, आठवडाभर किचनमध्ये साठवले अन् नंतर तेच…

युकेमध्ये 28 वर्षीय पतीने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. हत्येनंतर त्याने पत्नीच्या मृतदेहाचे तब्बल 200 तुकडे केले. मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्याआधी त्याने आठवडाभर ते किचनमध्ये साठवून ठेवले होते. आठवड्याभरानंतर मित्राच्या सहाय्याने त्याने ते नदीत फेकून दिले. ही घटना उघड आल्यानंतर अनेकांना श्रद्धा वाळकर प्रकरणाची आठवण झाली आहे. प्रियकर आफताब पुनावाला याने श्रद्धा वाळकरची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केले होते. 

निकोलस मेटसन याने वर्षभर आपल्यावर लावण्यात येत असलेले आरोप फेटाळले होते. पण अखेर त्याने शुक्रवारी पत्नीच्या हत्येची कबुली दिली. मार्च 2023 मध्ये आपली पत्नी हॉली ब्रॅमली (26) हिची हत्या केल्याचं त्याने मान्य केलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा पोलीस हॉलीला शोधत घरी आले होते, तेव्हा त्याने मस्करी करत पलंगाखाली लपली असेल असं म्हटलं होतं. मेटसन सध्या पत्नीची हत्या केल्याच्या आरोपाखाली जेलमध्ये आहे. 

आरोपी मेटसन याने पत्नीची बेडरुममध्ये चाकूने अनेकदा भोसकून हत्या केली. यानंतर बाथरुममध्ये तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. हे तुकडे त्याने प्लास्टिकच्या पिशवीत साठवले होते. ही पिशवी त्याने किचनमध्ये अन्न साठवण्याच्या थंड ठिकाणी ठेवली होती. यानंतर त्याने या मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावली. 

हेही वाचा :  भारतीयाचं दानवी रुप पाहून ऑस्ट्रेलियन कोर्टही हादरलं, कॅमेऱ्यात सापडले बलात्काराचे 47 व्हिडीओ, महिला बेशुद्ध असताना....

हत्येच्या जवळपास एका आठवड्यानंतर आणि पोली घऱी पोहोचण्यापूर्वी त्याने त्याच्या मित्राला मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यात मदत करण्यासाठी 50 पाऊंड दिले होते. “मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी फक्त 50 पाऊंड मिळाले,” अस मित्राने संदेशात लिहिल्याचं कोर्टात सांगण्यात आलं आहे. 

मॉर्निग वॉकसाठी गेलेल्या एका व्यक्तीला विथम नदीत एक प्लास्टिकची पिशवी तरंगताना आढळली. यामधील एका बॅगेत मृतदेहाचा हात आणि दुसऱ्यात मुंडकं होतं. डायव्हर्सला एकूण मृतदेहाचे 224 तुकडे सापडले असून, त्यातील काही हाती लागलेले नाहीत. मृतदेह अशा प्रकारे कापण्यात आला आहे की, त्यातून हत्येचं कारण समजणं अशक्य आहे असं कोर्टात सांगण्यात आलं. 

हॉली ब्रॅमलीच्या आईने कोर्टात सांगितलं की, मुलीचं 16 महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. तिचा पती तिला कुटुंबाला भेटण्याची परवानगीही देत नव्हता. ते घटस्फोट घेण्याच्या तयारीत असतानाच त्याने तिची हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने “माझ्या पत्नीचा मृत्यू झाल्यास मला काय फायदा होईल” आणि “मृत्यूनंतर कोणी मला त्रास देऊ शकेल का?” अशा प्रश्नांची उत्तरं शोधली. 

ब्रॅमली एकदा तिच्या पाळीव सशांसह घरातून पळून गेली होती. मेटसनने हॅमस्टरला फूड ब्लेंडर आणि मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये टाकून मारल्यानंतर तिने पोलिसांची मदत मागितली होती. त्याने तिच्या नवीन पिल्लाला वॉशिंग मशिनमध्ये ठेवल होतं. 

हेही वाचा :  मौजमजा करण्यासाठी महाविद्यालयीन मुलांनी लढवली अनोखी शक्कल, पोलिसांनी घेतलं ताब्यात

गतवर्षी 24 मार्चला पोलीस वेलफेअर चेकसाठी घरी पोहोचले असता मेटसनने आपणच पत्नीच्या हिंसेचे शिकार असल्याचा दावा केला होता. आपल्या हातावर पत्नी चावल्याची खूणही त्याने दाखवली होती. दरम्यान कोर्टात देण्यात आलेल्या माहितीनुसार, मेटसनच्या तावडीतून सुटण्यासाठी तिने चावा घेतला होता. 

पोलिसांना बाथटबमध्ये रक्ताने भिजलेल्या चादरी, जमिनीवर अनेक निशाण आढळले. तसंच घरात अमोनिया आणि ब्लीचचा तीव्र वास येत होतं. दरम्या मेटसनने पत्नीची हत्या कशी केला याचा उलगडा केलेला नाही. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …