Shraddha Murder Case: आफताबने श्रद्धाची हाडं मिक्सरमध्ये टाकली अन् नंतर…”, पोलिसांचा धक्कादायक खुलासा

Shraddha Murder Case: आफताबने श्रद्धाची हाडं मिक्सरमध्ये टाकली अन् नंतर…”, पोलिसांचा धक्कादायक खुलासा


Shraddha Murder Case: संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात (Shraddha Walkar Murder Case) अजून काही धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताब पुनावाला (Aftab Poonawala) याने तिची हाडं मिक्सरमध्ये टाकून त्याचा चुरा केला होता. यानंतर त्याने त्या राखेची विल्हेवाट लावली होती असा दिल्ली पोलिसांचा (Delhi Police Chargesheet) दावा आहे. आफताबने मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर जंगलात फेकून दिले होते. यामध्ये तिचं मुंडकं सर्वात शेवटी होतं. त्याने तब्बल तीन महिन्यांनी हे मुंडकं फेकून दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी पोलिसांनी 6600 पानांचं चार्जशीट दाखल केलं आहे. चार्जशीटमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, 18 मे 2022 रोजी हत्येच्या रात्री आफताबने झोमॅटोवरुन (Zomato) चिकन रोल मागवले होते. 

कुटुंबीयांनी विरोध केल्यानंतर श्रद्धा आफताबसह दिल्लीत वास्तव्यास आली होती. पण दिल्लीत आल्यानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये वाद सुरु झाले होते. घरखर्च, आफताबची प्रेयसी अशा अनेक मुद्द्यांवरुन दोघांमध्ये खटके उडू लागले होते. चार्जशीटमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, आफताबच्या दिल्लीपासून ते दुबईपर्यंत प्रेयसी होत्या. 

Shraddha Murder Case: श्रद्धा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, आफताबने श्रद्धाचं मुंडकं कापून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर….

हेही वाचा :  रणबीर याच्या नंतर कपिल शर्मा आणि हुमा कुरेशी यांना ईडीचे समन्स; सखोल चौकशी होणार

 

8 मे रोजी दोघेही मुंबईला जाणार होते. पण अचानक आफताबने तिकीट रद्द केलं होतं. यावरुन दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण झालं होतं. भांडणादरम्यान आफताबने गळा दाबून श्रद्धाची हत्या केली. चार्जशीटमध्ये सांगितलं आहे त्यानुसार, आफताबने प्रथम मृतदेह एका प्लास्टिक पिशवीत गुंडाळून फेकून देण्याचा विचार केला होता. त्याने त्यासाठी पिशवीही विकत आणली होती. पण आपण पकडले जाऊ या भीतीने त्याने ही योजना रद्द केली. यानंत त्याने मृतदेहाचे तुकडे केले. यासाठी त्याने एक करवत, एक हातोडा आणि तीन चाकू विकत घेतले. बोटं वेगळी करण्यासाठी त्याने ब्लो टॉर्चचा वापर केला. 

आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवून दिले. जेव्हा कधी घरी प्रेयसी यायच्या तेव्हा आफताब फ्रीजमधून मृतदेहाचे तुकडे काढून ते किचनमध्ये ठेवत असे असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

आफताबने श्रद्धाचा फोन आपल्याकडेच ठेवला होता. 18 मे नंतर तोच श्रद्धाच्या अकाऊंटचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे. यानंतर त्याने तिच्या मोबाइलची विल्हेवाट लावली होती. पोलिसांना मृतदेहाचे 20 तुकडे सापडले आहेत. पण अद्याप मुंडकं सापडलेलं नाही. 

हेही वाचा :  Share Market Collapsed: 4 तासांत तब्बल 30000000000000 चा चुराडा; 2020 नंतरची सर्वात मोठी पडझड

पॉलीग्राफ आणि नार्को-टेस्टमध्ये आफताबने आपला गुन्हा कबूल केला आहे. यावेळी त्याने आपल्याला पश्चाताप होत असल्याचं म्हटलं असल्याचाही उल्लेख चार्जशीटमध्ये आहे. आफताबचा कबुली जबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. त्याने पोलिसांसमोर दिलेला पहिला कबुलीजबाबही न्यायालयात वापरता येत नाही. अटक केलेल्या व्यक्तीने दिलेला दाखला केवळ न्यायदंडाधिकार्‍यासमोर सादर केल्यावरच पुरावा म्हणून वापरता येतो.

केस भक्कम करण्यासाठी पोलिस फॉरेन्सिक सायन्सवर अवलंबून आहेत आणि प्रत्येक गोष्टीची खात्री करत आहेत.



Source link