Shocking Case: श्रद्धा वालकर, कांझावला प्रकरणापुर्वीही ‘या’ भयंकर घटनांनी हादरला होता देश

Top Famous Murder Cases: आपल्या जगात अशी अनेक रहस्य आहेत ज्यांचा उलगडा अद्याप झालेलाही नाही. अशा अनेक घटना आहेत ज्यांनी अख्ख्या जगाला हादरवून टाकलं. भारतातही अशा अनेक रहस्यमय आणि गुंतांगुतींच्या घटना घडल्या आहेत, ज्यांची उत्तरं अद्यापही कोणाला सापडली नाहीत. त्यातून गुन्हेगारी आणि हत्याकांड (Murder Case) विश्वात अशा अनेक घटना मानवी मनाला चटका लावून गेल्या आहेत अशाच काही घटनांनी भारतात नागरिकांना पुर्णपणे हादरवून सोडले होते. मागच्या वर्षी आणि यावर्षी घडलेल्या दोन भीषण घटनांनी संपुर्ण भारतात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण केले होते. एक म्हणजे श्रद्धा वालकर हत्याकांड (Shraddha Walker Case) आणि दुसरी म्हणजे कांझावलामध्ये झालेल्या अंजली शर्माचा भीषण मृत्यू. परंतु यापुर्वीही देशाला हादरवून टाकणारा अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यांनी मानवी क्रुर कृत्याचे दर्शन तर घडवले होतेच पण त्याचसोबतच स्त्रियांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न मांडला होता. (Indian shocking cases these were the top famous cases happened in india read the full article) 

नोव्हेंबर 2022 मध्ये समोर आलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडानं अख्ख्या देशातल्याच नाही तर जगातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. आपल्याच प्रेयसीला (Lovers) मारून तिच्या शरीराचे 35 तुकडे करणाऱ्या या कृत्यानं अख्खा देश हादरून गेला होता. त्यानंतर ही घटना लोकं पचवतायत तोच 1 जानेवारी 2023 ला कांझावला येथील अंजली शर्माच्या केसनं सगळीकडेच पुन्हा गदारोळ माजवला होता. गाडीखाली तिला 14 किलोमीटर फरवटत नेल्यानं तिचा मृत्यू झाला होता. परंतु याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्या पाहूया आधी घडलेल्या घटनांची एक झलक – 

हेही वाचा :  औरंगाबादच्या नामांतरावरुन सुधीर मुनगंटीवार यांची शिवसेनेवर टीका, म्हणाले “एमआयएमला खुश ठेवण्यासाठीच…”

1. तंदूर मर्डर केस – 

भारतात सगळ्यात गाजलेली घटना होती ती म्हणजे तंदूर मर्डर केस (Tandur Murder Case). या घटनेला तंदूर कांड असेही म्हटले गेले आहे. हा हत्याकांडमध्ये आपल्याच पतीनं तिच्या पतीवर गोळी झाडली आणि मग त्यानं तिचा मृतदेह लपविण्यासाठीही एका हॉटेलच्या तंदूर भट्टीत तिचा मृतदेह जाळून टाकला होता. त्या मृतदेहाची अवस्था इतकी वाईट होती की हॉटेल चालकांना ते पाहून अक्षरक्ष: धक्का बसला होता. ही घटना दिल्ली येथे घडली होती. सुशील शर्मानं आपली पत्नी नयना साहनी हिचा खून केला होता त्यासाठी त्यानं खूप मोठा सापळा रचला होता. नयना साहनी या राजकारणी होत्या आणि कॉंग्रेस पक्षात कार्यरत होत्या. 2 जूलै 1995 रोजी ही घटना घडली होती. आपल्या पत्नीचे मतलूब करिब या व्यक्तीसोबतचे संबंध सुशील शर्माला खटकायचे त्यामुळे त्याला तिच्याविरूद्ध हा डाव रचला होता. सुशीलला मतलूब आणि नयनामध्ये प्रेमाचे संबंध आहेत यावर संशय होता.

2 जूलैच्या रात्री सुशील घरी आला तेव्हा त्यानं पाहिलं की नयना कोणाशी तरी फोनवर दारू पित बोलत आहे. तेव्हा त्याला संशय आला की ती मतलूबशी बोलते आहे. त्यावर त्यांच्याच बाताबाती झाली आणि सुशील तिचा गोळ्या झाडून खून केला. या खूनात ज्या हॉटेलमध्ये नयनाचा मृतदेह तंदूरमध्ये जाळला होता त्या हॉटेलचा कर्मचारी केशव कुमारही या हत्येत सहभागी होता. केशव कुमारला अटक केली आणि त्यानंतर सुशील कुमारही पकडला गेला आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली परंतु 2018 साली त्याला तुरूंगातून सोडण्यात आले. द तंदूर मर्डर : द क्राईम दॅट शूक द नेशन आणि ब्रॉट अ गव्हरमेंट टू इट्स नीझ हे मॅक्सवेल परेरा यांचे गाजलेले पुस्तकही 2018 साली प्रदर्शित झाले होते. 

हेही वाचा :  '100 टक्के आरक्षण मिळेल पण',... मराठा आरक्षणाबाबत गिरीश महाजन यांचे अत्यंत महत्वाचे वक्तव्य

2. जोशी अभ्यंकर हत्याकांड – 

पुण्यातील सर्वात गाजलेले हत्याकांड म्हणजे जोशी – अभ्यंकर खून प्रकरणं (Joshi Abhyankar Murder Case). 1977 च्या हिवाळ्यात पुण्यात या हत्याकांडानं अक्षरक्ष: पुणेकरांची झोप उडवली होती. ज्या पाच जणांनी हे हत्याकांड केले होते ते टिळक रोड येथील अभिनव कला महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी होते. या सगळ्यात राजेंद्र जकाल, दिलीप सुतार, शांतराम कान्होजी, मुनावर हरून शहा या चौघांनी पुण्यात 10 खून केले होते. सर्वात पहिला खून त्यांनी प्रकाश हगडे याचा केला होता. त्याचे वडिल सुंदर हगडे यांना या हत्यारांनी धमकीचा फोन केला होता. हा मुलगा त्यांच्या महाविद्यालयाच्या जवळ असणाऱ्या हॉटेलच्या मालकाचा मुलगा आहे. प्रकाशचे त्यांनी अपहरण केले होते आणि 16 जानेवारी 1976 रोजी त्याचा नायलॉन रोपनं खून केला होता. त्यानंतर 31 ऑक्टोबर 1976 रोजी त्यांनी जोशी कुटुंबियातील पती – पत्नीचा खून केला होता.

त्यानंतर 22 नोव्हेंबर 1976 रोजी यशोमती बाफना यांच्या बंगल्यावर हल्ला करून त्यांचा खून केला. त्यानंतर त्यांनी 1 डिसेंबर 1976 साली अभ्यंकर कुटुंबातील संस्कृत अभ्यासक काशीनाथ शास्त्री अभ्यंकर त्यांची पत्नी इंदिराबाई आणि त्यांची मोलकरीण सखूबाई वाघ आणि त्यांची दोन नातवंडं जूई आणि धनंजय यांचा खून केला. शेवटचा खून त्यांच्याच मित्राच्या भावाचा केला होता. जी घटना 23 मार्च 1977 रोजी घडली, त्याचं नावं अनिल गोखले असं होते. हे खून त्यांनी पैशांच्या प्रभावात येऊन केले होते. 1983 साली त्यांना फाशीची शिक्षा झाली. 

हेही वाचा :  महाराष्ट्रातील 5 निसर्गसंपन्न गावं, सौंदर्य पाहून म्हणाल जणू स्वर्गच

3. बालवा मर्डर केस – 

ही घटना सर्वात जुनी असली तरी या घटनेनं ब्रिटिश काळात भारतात मोठा गदारोळ माजवला होता. ही घटना 1925 रोजी घडली होती. 98 वर्षांपुर्वी घडलेल्या या घटनेनं खळबळ माजवून दिली होती. यामध्ये इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर तृतीय, त्यांच्या राजमहालात नर्तकी असलेली मुमताज बेगम आणि मुंबईतील एक श्रीमंत व्यावसायिक अब्दुल कादर बावला यांचा या स्टोरीत समावेश होता. 

बावला आणि मुमताज एका गाडीत बसून मलबार हीलवर पोहोचले आणि अतिश्रीमंत अशा मलबार हील परिसरात आल्यानंतर त्यांच्या समोर एक दुसरी गाडी येऊन ठेपली आणि तेवढ्यात त्यांच्या गाडीवर गोळीबार सुरू झाला आणि क्षणार्धात चित्र पालटले. या बावला यांच्यावर कोणतरी गोळीबार करून त्यांचा खून केला होता. ही घटना आहे 12 जानेवारी 1925 ची. जेव्हा त्यांच्या समोरच्या गाडीतून आठ माणसं उतरली तेव्हा बावला यांचा खून केला आणि मुमताज यांचे अपहरण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर तृतीय यांच्या महालात राहणारी मुमताज ही नंतर बावलाकडे राहू लागली. या घटनेची वृत्तपत्रात चर्चा झाली आणि नामवंत व्यक्तींनीही या घटनेवर भाष्य केले होते. मुमताज या पुढे हॉलिवूडमध्ये गेल्या पण पुढे काय झालं याबद्दल काहीच कल्पना नाही. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …