भावा जिंकलस रे! बाप-लेकाचा VIDEO पाहुन तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Best Gift For Father : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ हे खुप धक्कादायक असतात. असाच एक मनोरंजक आणि भावूक करणारा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत मुलाने बापाला सर्वात मोठं गिफ्ट दिले आहे. हे गिफ्ट पाहून बाप भावूक झाला आहे. या संदर्भातला व्हिडिओ समोर आला आहे.   

हे ही वाचा : भावाने नादच केला! ब्रिटनच्या रस्त्यावर चालवली रिक्षा, पाहा VIDEO

व्हिडिओत काय? 

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एक वडिल सोफ्यावर बसला आहे. त्याच्या हातात एक गिफ्ट आहे. हे गिफ्ट ते खोलतात. आणि त्यांच्या हातात गाडीची एक चावी येते. ही चावी घेऊन त्यांना त्याचा मुलगा आणि मुलगी घराबाहेर नेतात. घराबाहेर एक बुलेट उभी असते. ही बुलेट पाहुन वडिलांच्या डोळयात पाणी येते. नंतर वडिल-आईला घेऊन राईडवर निघतात. 

मुलाने जी वस्तू वडिलांना वाढदिवसाची भेट म्हणून दिली आहे, त्या वस्तूबाबत वडिलांनी एकदा सांगितले होते की, बेटा आम्हाला परवडणार नाही, ती खुप महाग आहे. पण वडिलांना ती गोष्ट किती आवडते हे मुलाला माहीत होते. त्यामुळे त्याने त्याच्या वाढदिवसाला बुलेट दिली. व्हिडिओत मुलाने दिलेले गिफ्ट पाहून वडिल त्याची गळा भेट देखील घेतात. ही गळाभेट पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. या संदर्भातला व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. 

हेही वाचा :  VIDEO: “छत्रपती केव्हाही रडत नाही, पण…”, वारकऱ्यांसमोर छत्रपती संभाजी राजेंचे डोळे पाणावले

 

मुलाची भावूक पोस्ट

दरम्यान हा व्हिडिओ शेअर करताना इंस्टाग्राम यूजर usidbodypro ने लिहिले की, तुमच्याबद्दल काय सांगू… माझ्याकडे शब्द नाहीत. तू माझा सुपरमॅन-सुपरगॉड आहेस. यापलिकडे त्याने एक भावूक पोस्ट देखील लिहली आहे. या पोस्टमध्ये तो लिहतो की, माझ्या वडिलांनी माझ्या आजोबांची (सब इन्स्पेक्टर) बाईक नेहमीच आवडायची, जी आजोबांच्या निवृत्तीनंतर खात्याला परत देण्यात आली होती.मात्र, याआधी मला त्याच्या बाईक प्रेमाबद्दल माहिती नव्हती, असे तिने म्हटले. 

पण गेल्या वर्षात जेव्हा आम्ही शोरूममध्ये अशीच बाईक पाहण्यासाठी गेलो होतो, आणि पप्पा ज्या प्रकारे बाईकबद्दल उत्साही होते, तेव्हा मला समजले की त्यांना ही बाईक किती आवडते. मात्र, ही बाईक खूप महाग असल्याने आणि परवडत नसल्याचे सांगितल्याने तो विकत घेऊ शकला नाही…म्हणून मला वाटले की त्यांच्यासाठी यापेक्षा चांगली भेट असूच शकत नाही, ज्यामुळे त्यांना आनंद होईल.

मुलगा पुढे म्हणतो की, मी देवाची आभारी आहे की त्याने मला त्याची स्वप्ने पूर्ण करण्याचे बळ दिले, आज मी जो काही आहे तो तुमच्या पाठिंब्यामुळे आहे.मला आठवते जेव्हा मी माझी नोकरी सोडली आणि त्याला सांगितले की मला माझी आवड आणि व्यवसाय करायचा आहे. मग ते म्हणाला की ठीक आहे. तू ते कर जे तुला आनंद देते, मी नेहमी तुझ्या सोबत आहे, असे या मुलाने पोस्टमध्ये म्हटलेय. मुलाने लिहलेली ही पोस्ट अनेकांना भावूक करत आहे.

दरम्यान हा व्हिडिओ 2 डिसेंबर रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडिओवर आतापर्यंत 24 लाखांहून अधिक व्ह्यूज, 3 लाख 82 हजारांहून अधिक लाईक्स आणि हजारो कमेंट्स आल्या आहेत. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी येतेय.

हेही वाचा :  ममतांच्या मैदानावर युसूफ पठाण 'इम्पॅक्ट प्लेयर', काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात दमदार बॅटिंग, ठरला 'जायन्ट किलर'Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

व्यवस्थित Zoom करून पाहा; अवकाशातून असा दिसतो ‘राम सेतू’… समोर आला पहिला स्पष्ट फोटो अन् नवी माहिती

Ram Setu high resolution photo : राम सेतू… भारतीयांसाठी कमालीचा जिव्हाळ्याचा विषय आणि संशोधकांसाठी संशोधनाचा …

PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही? हायकोर्टाचा सवाल; म्हणाले, ‘चालण्याची जागा मूलभूत अधिकार’

Bombay High Court On Footpaths Streets: मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एका प्रकरणासंदर्भात भाष्य करताना पंतप्रधान आणि …