चांगल्या मौखिक आरोग्याची चिन्हे
डॉक्टरांच्या मते, जर तुमच्या दातांचा रंग पांढरा असेल, हिरड्या गुलाबी आणि निरोगी दिसत असतील आणि फ्लॉस केल्यावर रक्त येत नसेल, श्वासाची दुर्गंधी येत नसेल, गरम किंवा थंड खाताना दाताला मुंग्या आल्या नाहीत, तर तुमचे तोंडाचे आरोग्य चांगले मानले जाऊ शकते.
टूथपेस्टचे प्रमाण
बऱ्याच लोकांना ब्रशवर भरपूर टूथपेस्ट घ्यायची सवय असते, कारण त्यांना वाटते की त्याने तोंड अधिक स्वच्छ होते. पण ही चुकीची संकल्पना आहे, कारण जास्त टूथपेस्ट खाल्ल्याने काही फायदा होत नाही. तुम्ही फक्त मटारा एवढ्या प्रमाणात टूथपेस्ट वापरावी.
(वाचा :- Mountain Climber Exercise: वयाच्या 30 नंतर स्त्री-पुरूषांनी माऊंटेन क्लाईंबर करणं गरजेचं,रहाल लोखंडाइतकं मजबूत)
हे पदार्थ दातांना चिकटत नाहीत
दातांमध्ये असलेली कॅव्हिटी आणि किडल्यामुळे होते. म्हणूनच डॉक्टर कुरकुरीत फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला देतात. हे पदार्थ दातांमध्ये अडकत नाहीत, जर तुम्ही ते पूर्णपणे चावलेत.
(वाचा :- सकाळीही फ्रेश वाटत नसेल, फक्त 4 कामं करून थकत असाल तर तुम्ही आहात या आजाराचे बळी, ताबडतोब जेवणात घाला हा मसाला)
ओरल हेल्थ टिप्सची काळजी घ्या
- दर ६-८ महिन्यांनी दातांची तपासणी करून घ्या.
- गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नका.
- दिवसातून दोनदा ब्रश आणि फ्लॉस करा. जीभ स्वच्छ करायला विसरू नका.
- प्रत्येक जेवणानंतर आपले तोंड स्वच्छ धुवा.
- कोणत्याही स्वरूपात तंबाखूचा वापर टाळा.
- तीक्ष्ण वस्तू हिरड्या आणि दातांपासून दूर ठेवा.