‘शिवतीर्थ’वरुन गोड बातमी: राज ठाकरे होणार आजोबा


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे. अर्थात ही भूमिका कोणतीही राजकीय भूमिका नसून वैयक्तिक आयुष्यामध्ये राज ठाकरेंचं आजोबा म्हणून प्रमोशन होमार आहे. राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली अमित ठाकरेंकडे गोड बातमी असल्याचं वृत्त आहे. नुकतीच अमित ठाकरेंना मनसेच्या विद्यार्थी सेनेची जबाबदारी देण्यात आली आहे. अशातच आता ही खासगी आयुष्यामधील प्रमोशनची बातमी समोर आलीय.

राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या नवीन निवासस्थानी सध्या या नव्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी सुरु असल्याचे समजते. राज आणि त्यांच्या पत्नी म्हणून आजी होणाऱ्या शर्मिला ठाकरे हे या बातमीमुळे फार आनंदात असून एप्रिल महिन्यात ठाकरे कुटुंबातील पुढच्या पिढीतील पाहुण्याचे आमगन होणार असल्याची माहिती समोर आलीय.

काही महिन्यांपूर्वीच राज हे त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानावरुन सहकुटुंब ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी शिफ्ट झाले. याच नवीन घरामध्ये आता ही चिमुकली पावलं खेळताना बागडताना दिसणार आहेत.

अमित ठाकरे यांचा विवाह २७ जानेवारी २०१९ रोजी मिताली बोरुडे यांच्याशी झाला. अमित यांच्या लग्नाला जकीय नेत्यांसह, उद्योग, चित्रपट तसेच इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. लोअर परळ येथील येथील सेंट रेजिस या आलिशान हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला होता.

हेही वाचा :  'माझ्यासोबत आली नाहीस तर...' पुण्यात 'लिव्ह इन' मध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत धक्कादायक प्रकार

२०१८ मध्ये डिसेंबर महिन्यात अमित आणि मिताली यांचा साखरपुडा पार पडला होता. मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. मिताली यांनी फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. मिताली यांचे वडील संजय बोरुडे हे प्रसिद्ध सर्जन आहेत. राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली यांची चांगली मैत्री आहे. काही वर्षांपूर्वी या दोघींनी मिळून ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता. अमित आणि मिताली यांची ओळख जुनी आहे. याच ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले आणि नंतर दोघंही विवाहबंधनात अडकले होते.

The post ‘शिवतीर्थ’वरुन गोड बातमी: राज ठाकरे होणार आजोबा appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …