तारा सुतारियाचं छोट्या ऑफ शोल्डर बॉडीकॉन कपड्यांत धमाकेदार फोटोशूट

बॉलिवूडमध्ये जितक्या लवकर रिलेशनशिप सुरू होते, तितक्या लवकर ब्रेकअपच्या बातम्या सुद्धा येऊ लागतात. अलीकडेच दिशा पाटणी आणि टायगर श्रॉफच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांची मनं तुटली होती. त्यातून चाहते सावरत होते न होते तोच आता आणखी एका ब्रेकअपची चर्चा सुरू झाली आहे. आमचे सहकर्मचारी E Times च्या रिपोर्टनुसार, तारा सुतारिया आणि आदर जैन यांचे ब्रेकअप झाले आहे. मात्र दोघांकडून अद्यापही कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

ही जोडी खरंच खूप क्युट आहे आणि ही बातमी खोटी ठरावी अशी आशा सगळेच करत आहेत. पण शेवटी हा त्या दोघांचा निर्णय आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला या लेखातून जरा वेगळी बातमी देणार आहोत. लव्ह, ब्रेकअप तर होतच असतात. पण बॉलीवूडमध्ये सगळ्यात जास्त डिमांड आहे ती स्टाईल आणि फॅशन सेन्सला आणि तारा सुतारिया सुद्धा यात मागे नाही हे तिच्या लेटेस्ट फोटोशूटवरून दिसून येतंय. तुम्ही स्वत:च बघा तिचे धमाकेदार फोटोशूट..! (फोटोज साभार – इंस्टाग्राम @tarasutaria)

गोड आणि सुंदर असा लूक

तारा सुतारियाने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूप जास्त सुंदर आणि गोड दिसते आहे. तिने आपल्या क्युट स्माईलसोबत हे फोटोशूट मोठ्या उत्साहाने केले आहे, ज्यावरून नजर हटता हटत नाहीये. तारा सुतारीयाने फॅशन डिझायनर सूर्या सरकारच्या कलेक्शनमधून हे आऊटफिट निवडलेले असून यातून तिची फिगर चांगली हायलाइट होताना दिसते आहे. तुम्ही एखाद्या डेट नाईटसाठी या प्रकारचा ड्रेस कॅरी करू शकता. मग पहा सगळ्या नजरा केवळ तुमच्यावरच खिळतील.

हेही वाचा :  Jitendra Avhad: 'पक्ष सोडून गेलेल्यांकडे आता फक्त एकच पर्याय!'

(वाचा :- ओठांवर लालभडक लिपस्टिक व लेदर पॅंटमध्ये नाजुकशी फिगर फ्लॉंट करताना दिसली मलायका, ऐन थंडीत वाढवला मुंबईचा पारा)

बॉडीकॉन ड्रेसमध्ये फिगर केली हायलाईट

ताराचा हा पांढऱ्या रंगाचा ड्रेस बॉडीकॉन पॅटर्नचा होता, जो तिची फिगर हायलाइट करण्याचे काम करत होता. या आउटफिटला वरच्या भागावर कॉर्सेट इन्स्पायर्ड लुक देण्यात आला होता, जो तिला स्टायलिश दिसण्यास मदत करत होता. बस्टियरच्या वरच्या भागावर मॅचिंग थ्रेडने टायर्ड डिटेलिंग दिली होती जी खूप जास्त लक्षवेधी वाटत होती आणि वळून वळून त्याकडे लक्ष जात होते. एकंदर हा आऊटफिट खूप युनिक होता आणि ताराला मस्त सूट होत होता.

(वाचा :- सुटाबुटात राहणारे अब्जाधीश मुकेश अंबानींचे आजकाल बदलले आहेत अदाअंदाज, नातवाच्या बर्थ डे मध्ये चर्चा आजोबांचीच)

स्टायलिश हिल्सने खेचले लक्ष

या शॉर्ट लेन्थ ड्रेसमध्ये ताराने तिचे टोन्ड लेग्स दाखवण्याची एकही संधी सोडली नाही. डीप स्वीटहार्ट नेकलाइन तिच्या लूकमध्ये बोल्डनेसची अजून भर घालत होती. ताराने या ड्रेससोबत पॉइंटेड ब्लिंगी हील्स घातल्या होत्या, ज्या खूप क्लासी दिसत होत्या. कॉकटेल पार्टीसाठी या प्रकारच्या हील्स परिधान करून तुम्ही देखील तुमच्या एकंदर लुकला मस्त क्लासी टच देऊ शकता.

हेही वाचा :  कल्याण- डोंबिवलीवरुन आता मेट्रोने नवी मुंबई गाठता येणार; तासांचा प्रवास मिनिटांत होणार

(वाचा :- करीनाने लावला थेट नीता अंबानी-मलायकाच्या चर्चांना पूर्णविराम, चमचमत्या स्लिट कट ड्रेसमध्ये केला न्यू ईयर धमाका)

असा केला लूक कम्प्लीट

ताराने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी हूप इअररिंग्स, सिल्व्हर ब्रेसलेट आणि अंगठ्या घातल्या होत्या. मेकअपसाठी हेवी फाउंडेशन, ग्लॉसी लिप्स, ब्रॉंझ हायलाइटर, मस्करा, आयशॅडोचा वापर केला होता. शार्प कोन्टोरसह केसांना सेंटर पार्टेड करून तिने मोकळे सोडले होते. ब्रेकअपच्या बातम्यांनंतर अभिनेत्री तारा सुतारियाचा हा लूक समोर आला आहे, जो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इतक्या सुंदर अभिनेत्री सोबत ब्रेकअप कसे काय होऊ शकते असाही सवाल अनेकांनी विचारला आहे.

(वाचा :- नीता अंबानींनी थाटामाटात केलं लाडक्या सुनबाईचं स्वागत, हिरवी साडी व केसांत गजरा घालून दिली नवरीलाही तगडी टक्कर)

ताराचा स्पेशल ब्यूटी मेसेज

तारा सुतारीया नेहमीच आपल्या चाहत्यांनी लुक्स विषयी टिप्स देत असते. ती म्हणते की, तुम्ही तुमचा मेकअप किती चांगल्या प्रकारे केला आहे या गोष्टीने काही फरक पडत नाही. जर तुम्ही सिलिका आणि एसपीएफयुक्त उत्पादनांचा वापर केला तर कॅमेराची फ्लॅश लाईट पडेल तेव्हा तुम्ही वाईट दिसाल. म्हणून कधीही पार्टी वा इव्हेंटमध्ये जाताना लक्षात ठेवा की तुम्हाला कॅमेराच्या फ्लॅश लाईटचा सामना करावा लागू शकतो आणि त्यानुसारच आपले मेकअप प्रॉडक्ट्स निवडा आणि कार्यक्रमात लोकांच्या विचित्र नजरेपासून स्व:चा बचाव करा.

हेही वाचा :  मलायकाच्या नितळ त्वचेच रहस्य आलं समोर, या गोष्टीमुळेच ४९ वर्षाही दिसते २० वर्षांची

(वाचा :- क्रॉप शर्टमधील उर्वशीचे थेट चाहत्यांच्या काळजावर वार, लुकपेक्षा केसातल्या त्या दोन क्लिप्सचीच झाली तुफान चर्चा)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …