शेतात जातानाच मृत्यने गाठलं, मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

Honey Bee Attack : मधमाश्यांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर, दाेघे जण गंभीर जखमी झाले आहेत.  जखमींवर रुग्णालायत उपचार सुरू आहेत. लातुरमधील निलंगा तालुक्यातील ममदापूर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. 

शेताकडे जात असताना बारा वर्षीय बालकावर आणि एका वृद्धावर मधमाशांनी अचानक हल्ला केला. यात बालक आणी वृध्द हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. तर, त्या दोघांना वाचवण्यासाठी गेलेल्या शेतकरी विश्वभंर बिराजदार यांचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यामध्ये जखमी झालेला मुलगा आणि आजाेबावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.निलंगा तालुक्यातील ममदापूर येथील ही धक्कादायक घटना घडली आहे.

अंत्ययात्रेदरम्यान मधमाशांचा हल्ला;  मृतदेह खाली ठेऊन नागरिक सैरावैरा पळाले

भंडा-यामध्ये मधमाशांनी नागरिकांवर हल्ला चढवलाय. यात तब्बल 200 नागरिक जखमी झालेत. तुमसर तालुक्यातील बाम्हणी इथल्या वैनगंगा नदीकाठी हा प्रकार घडलाय. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाच्या  अंत्ययात्रेदरम्यान मधमाशांनी हा हल्ला चढवलाय. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला… मृतदेह खाली ठेऊन नागरिक सैरावैरा पळू लागले. अखेर आनेकांनी मधमाशांपासून सुटका करून घेण्यासाठी नदीत उड्या मारल्या. यावेळी काही तरुणांनी मोठ्या हिमतीनं पार्थिव नेऊन त्यावर अंत्यसंस्कार केले.

हेही वाचा :  दुर्मीळ रुद्राक्षाची साताऱ्यात लागवड

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात हरदोली-झंझाळ इथं स्मशानभूमीत मधमाशांनी नागरिकांवर हल्ला केला. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारावेळीच हा प्रकार घडला. चितेला अग्नी देताच जवळच्याच झाडावरील मधमाशांचा थवा आक्रमक झाला आणि त्यांनी तिथं जमलेल्या नागरिकांवर हल्ला चढवला. यात गेल्या काही दिवसातील भंडारा जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. 

राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला

राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केलाय. मधमाशांच्या हल्ल्यात 20 ते 25 पर्यटक जखमी झाले असून त्यातील एक जण बेशुद्ध पडलाय. सुवेळा माची परिसरात ही घटना घडलीये.. अचानक मधमाशांच्या थव्यानं हल्ला केल्यानं किल्ल्यावर एकच धावपळ उडाली. मधमाशांपासून वाचण्यासाठी काही पर्यटक गवतात लपून बसले.

गणपती विसर्जनावेळी मधमाशांनी ग्रामस्थांवर हल्ला

गणपती विसर्जनावेळी मधमाशांनी ग्रामस्थांवर हल्ला करत त्यांचा चावा घेतला. हिर्डोशी गावात नीरा देवधर धरणाच्या काठावर गणपती विसर्जनासाठी नागरिक आले होते. आरती करत असताना अचानक मधमाशांना ग्रामस्थांवर हल्ला चढवला. यात लहान मुलांसह, महिला आणि पुरुष अशा एकूण 100 पेक्षा जास्त जणांचा मधमाशांनी चावा घेतला. अखेर विसर्जन न करताच ग्रामस्थांवर तिथून निघून जाण्याची वेळ ओढवली. मधमाशा गेल्यानंतर मग काही ग्रामस्थांनी काठावर जात विसर्जन पार पाडलं.

हेही वाचा :  नागपूर, नाशिकनंतर कोल्हापुरातही वनरक्षक पदाच्या भरती प्रक्रियेत मोठा गोंधळ; परिक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळणे कठिण



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …