शीळफाटा रस्ता दहा दिवसांत वाहतुकीसाठी खुला; वाहनचालकांना दिलासा


डोंबिवली :  दुरवस्था झालेल्या शीळफाटा खिंड ते महापे रस्त्याचे काम युद्धपातळीवर  दहा दिवसांतपूर्ण करीत शुक्रवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे नवी मुंबईकडे येणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळाला असून वाहतूक कोंडीसह वळसा घालून सुरू असलेला प्रवासातून सुटका झाली आहे.

शीळफाटा दत्तमंदिर चौकातून एक रस्ता ठाणे, दुसरा पनवेल, तिसरा रस्ता कल्याण-बदलापूर दिशेकडे जातो. चौथा रस्ता चौकातून नवी मुंबईत जातो. नवी मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुला एमआयडीसीच्या बारवी धरणाकडून आलेल्या जलवाहिन्या आहेत. या जलवाहिन्यांमधून नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा केला जातो. या जलवाहिन्यांच्या बाजूला एमआयडीसीने सेवा रस्ता बांधला आहे. हा रस्ता फक्त जलवाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी असल्याने या रस्त्यावर फक्त एमआयडीसीचा अधिकार आहे.  शीळफाटा दत्तमंदिर चौकातून जलवाहिन्या असलेल्या या खिंडीतील रस्त्यावरून महापे दिशेने जाण्यासाठी मधला रस्ता आहे. हा रस्ता ३०० मीटरचा आहे. या रस्त्याची जूनपासून मुसळधार पावसाने दुरवस्था झाली होती. तात्पुरती खडी टाकून हा रस्ता एमआयडीसीकडून दुरुस्त केला जात होता. पण सततचा पाऊस, वाहनांच्या वर्दळीमुळे या रस्त्याची चाळण झाली होती. या रस्त्यावरून वाहने चालविताना चालकांना कसरत आणि प्रवाशांची आदळआपट होत होती.

हेही वाचा :  Vijay Diwas 2022 : 1971 च्या बांग्लादेश मुक्ती युद्धात भारताचा पाकिस्तानवर विजय

हा रस्ता खराब असल्याने अनेक वाहन चालकांना शीळफाटा चौकातून मुंब्रा दिशेने जाऊन वळण घेऊन मग महापे दिशेने जावे लागत होते. या वळशामुळे प्रवाशांना मुंब्रा दिशेकडील अवजड वाहतूक कोंडीत अडकावे लागत होते. त्यामुळे खिंडीतील रस्ता दुरुस्त करावा अशी प्रवाशांची मागणी होती. खिंडीतील रस्त्यावरून कल्याण, बदलापूर, पनवेलकडून येणारी जाणारी वाहने वाहतूक करतात.  गेल्या १० महिन्यांपासून स्थानिक आमदार प्रमोद पाटील शीळफाटा खिंडीतील रस्त्याची दुरुस्त करावी म्हणून एमआयडीसी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत होते.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …