चॅटिंगदरम्यान महिलांना ‘हार्ट इमोजी’ पाठवताय, आता महागात पडेल.. होऊ शकतो इतक्या वर्षांचा तुरुंगवास

Heart Emoji: सोशल मीडियाच्या जमान्यात WhatsApp हे सद्यस्थितीला सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसजिंग अ‍ॅप (Messaging App) आहे. व्हाट्सॲपकडून आपल्या यूजर्संना अनेक नवीन फिचर दिले जातात, सोप्यापद्धतीने चॅट करण्याचे पर्याय दिले जातात. यातलाच एकक पर्याय म्हणजे इमोजी (Emoji). आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी बऱ्याचवेळा आपण वैयक्तिक आणि ग्रुप चॅटवर इमोजी वापरून मेसेजवर प्रतिक्रिया देत असतो. कधी दु:ख तर कधी प्रेम व्यक्त करण्यासाठी, कधी हसणं तर कधी रडणं व्यक्त करण्यासाठी इमोजीचा सर्रास वापर केला जातो. महिलांशी चॅटिंग करताना अनेकजणं ‘हार्ट इमोजी’ (Heart Emoji) पाठवतात.

पण यापुढे चॅटिंगदरम्यान एखाद्या महिलेला हार्ट इमोजी पाठवणं गुन्हा ठरणार आहे. यासाठी तुम्हाला तुरुंगावासही होऊ शकतो. जर तुम्ही आखातातल्या दोन इस्लामिक देशांच्या सहलीवर असाल आणि एखाद्या महिलेशी चॅटिंग करताना ‘हार्ट’ इमोजी पाठवत असाल तर असं करणं तुम्हाला महागात पडू शंते. कुवेत (Kuwait) आणि सौदी अरेबिया (Saudi Arabia) हे ते दोन मुस्लिम देश आहेत.. या देशात चॅटिंगदरम्यान एखाद्या महिलेला ‘हार्ट’ इमोजी पाठवल्यास दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किंवा व्हॉट्सअॅपवर महिलेला किंवा मुलीला ‘हार्ट’ इमोजी पाठवणं या देशात आता गुन्ह्याच्या श्रेणीत नोंद होणार आहे. या इमोजीचा वापर अय्याशीसाठी प्रवृत्त करणं असं धरला जाईल. व्हॉट्सअॅपवर कोणत्याही मुलीला किंवा महिलेला हार्ट इमोजी पाठवणे हा छळच मानला जाईल, असे सौदीच्या सायबर क्राईम तज्ज्ञांनी म्हटले आहे. इतकंच नाही तर महिलेने गुन्हा दाखल केल्यास तुरुंगवास आणि दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. 

हेही वाचा :  विक्रमादित्य वैदिक घड्याळाच्या 'या' 5 गोष्टी तुम्हाला माहितीयेत का? जगाला भारतामुळे मिळाली नवी भेट

कुवेतमध्ये अशी शिक्षा
कुवेतचे कायदेशीर सल्लागार अल सलाही यांनी दिलेल्या माहितीनुसार हा कायदा मोडणाऱ्या किंवा दोषी आढळणाऱ्या व्यक्तीला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाईल. इतकंच  नाही तर त्या व्यक्तीला 2,000 कुवेती दिनारांचा आर्थिक दंडही भरावा लागणार आहे, भारतीय रुपयात ही किंमत 5.38 लाख रुपये इतकी होते.

सऊदी अरबमध्ये कठोर शिश्रा
सऊदी अरबमध्ये तर आणखी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सऊदी अरबमध्ये चॅटिंगदरम्यान एखाद्या महिलेलाय हार्ट इमोजी पाठवला, तर अशा व्यक्तीला दोषी ठरवलं जाईल. दोषी ठरवलेल्या व्यक्तीला दोन ते पाच वर्षांचा तुरुंगवाद होऊ शकतो. याशिवया दोषी व्यक्तीला 1 लाख सऊदी रियाल म्हणजे तब्बल 22 लाख रुपये दंड भरावा लागेल. हा गुन्हा वारंवार केल्यास त्या व्यक्तीच्या तुरुंगावास आणि आर्थिक दंडातही वाढ केली जाईल. दुसऱ्यांदा हा गुन्हा केल्यास पाच वर्ष तुरुंगवास आणि 66 लाख रुपयांपर्यंत दंडाची रक्कम वाढू शकते. हा नियम कुवेत आणि सऊदी अरब सोडल्यास भारत किंवा इतर कोणत्याही देशात नाही.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …